Maharashtra Vidhan Sabha : राज्याची विधानसभा निवडणूक 'या' 5 मुद्द्यांभोवती फिरणार, कुणाला फटका बसणार?
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर सरकारने अॅक्शन मोडमध्ये येत अनेक महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात कोणत्या मुद्द्यांची चर्चा होणार?
विधानसभेला कोणते विषय महत्वाचे ठरणार?
राज्याची विधानसभा निवडणूक या 5 मुद्द्यांभोवती फिरणार
लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर महायुतीच्या पदरी निराशाच पडली होती. त्यानंतर मात्र महायुती सरकारने अॅक्शन मोडमध्ये येत अनेक महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या. विशेषत: लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चर्चेचं कारण ठरली. त्यामुळे लोकसभेपेक्षा हे निकाल वेगळे असणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर मतदार भाजपवर नाराज असून, महायुतीला त्याचा फटका बसेल असं मविआचं म्हणणं आहे. तर तीच महाविकास आघाडी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ही विधानसभा निवडणूक लढताना दिसत आहे. तर महायुतीने कल्याणकारी योजना आणि विकासाच्या मुद्द्यांच्या माध्यमातून प्रचार करतााना दिसत आहे. त्यामुळेच या निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत? जाणून घेऊ.
1. शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या










