Rahul Gandhi : पेंटर आणि दिवे बनवणाऱ्यांसोबत यंदा राहुल गांधींची दिवाळी, पण व्हिडीओतल्या 'या' खास गोष्टीची होतेय चर्चा

मुंबई तक

राहुल गांधी यांनी आपली दिवाळी कामगारांसोबत साजरी केली आहे. राहुल गांधी यांच्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन याद्दलचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पेंटर आणि दिवे बनवणाऱ्यांसोबत राहुल गांधींची दिवाळी

point

राहुल गांधी यांच्या अकाऊंटवरुन व्हिडीओ प्रसिद्ध

point

राहुल गांधींच्या व्हिडीओची का होतेय चर्चा?

देशभरात आज मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जातेय. अंधारावर प्रकाशाने विजय मिळवण्याच्या या सणामध्ये प्रत्येकजण आपलं जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करत असतो. राजकीय नेतेमंडळीही वेगवेगळ्या पद्धतीनं दिवाळी सण साजरा करत असतात. तर त्यातच आता काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली दिवाळी कामगारांसोबत साजरी केली आहे. राहुल गांधी यांच्या सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन याद्दलचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. 

 

हे ही वाचा >>Nagpur : दहशतवाद्यांच्या टार्गेटवर विमानतळं, मी फक्त फडणवीसांनाच... देशभर धमकीचे मेल पाठवणारा सापडला, धक्कादायक माहिती समोर


काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये ते दिवाळीला घरांना रंग देणारे आणि दिवे बनवणाऱ्यांसोबत काम करताना दिसतायत. हातात पेंटिंग ब्रश घेऊन कुंभाराच्या चाकावर मातीच्या वस्तू बनवण्याचं कामही राहुल गांधींनी केलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. राहुल गांधी यांनी कामगार आणि कुंभार बांधवांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp