Nagpur : दहशतवाद्यांच्या टार्गेटवर विमानतळं, मी फक्त फडणवीसांनाच... देशभर धमकीचे मेल पाठवणारा सापडला, धक्कादायक माहिती समोर
देशातल्या वेगवेगळ्या विमानांमध्ये घातपाताच्या धमक्या आल्या होत्या. विमान कंपन्यांना धमकीचे फोन करून दहशत पसरवणाऱ्या जगदीशला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
देशभर विमानांना धमकीचे मेल पाठवणारा अटकेत
आरोपीकडून समोर आली धक्कादायक माहिती
Nagpur Police : मागच्या काही काळात देशातल्या वेगवेगळ्या विमानांमध्ये घातपाताच्या धमक्या आल्या होत्या. यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांसह सर्वच केंद्रीय यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. त्यातच आता विमान कंपन्यांना धमकीचे फोन करून दहशत पसरवणाऱ्या जगदीशला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून त्याच्याकडून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
ADVERTISEMENT
नागपूर पोलिसांनी अटक केलेल्या या व्यक्तीचं नाव जगदीश उईके असं असून, तो ३५ वर्षांचा आहे. आरोपी जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याला अटक करण्यात आली. आरोपी दिल्लीहून नागपूर आला असता त्याला अटक करण्यात आली आहे. जगदीश उईकेने जानेवारीपासून आतापर्यंत अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची आणि स्फोटाची धमकी दिली. मेलद्वारे ही माहिती पाठवून जगदीश आपलं काम करायचा. आरोपी जगदीशने २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान ३० ठिकाणी स्फोट घडवण्याची धमकी देणारे मेलही पाठवले होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वेचे महासंचालक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय नेत्यांना आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आरोपीने धमकीचे ईमेल केले होते. पोलिसांनी मेलच्या आयपी ॲड्रेसवरून ईमेल पाठवणाऱ्या तरुणाची ओळख पटवली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. हा मेल जगदीश उईके नावानेच असल्यानं पोलिसांना ओळख पटली आणि कारवाई करण्यात आली. पोलीस अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. पाठवला असून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते.
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीसांच्या नावाचाही मेलमध्ये उल्लेख...
हे ही वाचा >> Arvind Sawant : 'माल' शब्द वापरणं भोवणार? शिवसेना महिला आघाडी अरविंद सावंतांविरोधात थेट....
धमकी देणाऱ्या या व्यक्तीने मेलमध्येच देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचीही अटही ठेवली होती. "मी देवेंद्र फडणवीस यांना भेटून बॉम्बस्फोटाशी संबंधित माहिती सांगेन" असं आरोपी म्हणाला होता. जगदीशने पाठवलेल्या ईमेलनुसार, 6 विमानतळं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. जैश ए मोहम्मद इंडिगो, विस्तारा, स्पाईसजेट, एअर इंडिया या कंपन्यांची 31 विमाने हायजॅक करणार असंही म्हटलं होतं. लागोपाठ हे मेल येत असल्यानं नागपूर पोलिसांसह देशातील सर्व तपास यंत्रणाही अलर्ट झाल्या होत्या. यंत्रणांना सर्व विमानतळांवर सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Sanjay Raut : रश्मी शुक्ला आमचे फोन ऐकतायत... निवडणुकीच्या तोंडावर फोन टॅपिंगचे आरोप, राऊतांचा फडणवीसांवरही निशाणा
आरोपी जगदीशने मेलमध्ये कोडवर्ड वापरले होते. त्यानुसार मार्केटसाठी M, रेल्वेसाठी R, एअरलाइनसाठी A हा शब्द वापरला होता. तसंच तो 28 ऑक्टोबरला दिल्लीला गेले होता, याहीपलिकडे जात तो थेट पीएमओमध्येही जाऊन आल्याचं कळतंय. नागपूर पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार जगदीश उईके याने ‘दहशतवादावर’ एक पुस्तकही लिहिलंय. हे पुस्तक ॲमेझॉनवरही उपलब्ध आहे. जगदीश उईकेचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही, मात्र ज्या लॅपटॉपवरून त्याने मेल पाठवला होता तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला. आरोपीने हा सगळा प्रकार स्फोट घडवून आणण्यासाठी नाही, तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तरी तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT