Kolhapur: '%# मारायला... मला तोंडघशी पाडलं, दम नव्हता तर...', सतेज पाटलांचा पारा एवढा का चढला?
मधुरिमाराजे या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात वातावरण तापलं असून, सतेज पाटील संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मधुरिमाराजे यांची अचानक माघार

नाईलाजाने त्यांनी माघार घेतल्याची शाहू महाराजांची प्रतिक्रिया

सतेज पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची तारीख जशी जवळ येतेय तसा घडामोडींचा वेगही वाढत जातोय. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता राज्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये चित्र स्पष्ट झालं आहे. तर अनेक मतदारसंघांमध्ये पेच कायम आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अखेरच्या क्षणी मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. मधुरिमाराजे या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात वातावरण तापलं असून, सतेज पाटील संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे. त्यामुळे आता इथे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. उमेदवारी कुणाला द्यायची यावरुन या मतदारसंघात सुरूवातीपासूनच काँग्रेस समोर आव्हान होतं. कारण एकीकडे राजेश लाटकर तर दुसरीकडे मधुरिमाराजे अशी दोन नावं इच्छुकांच्या यादीत होती. राजेश लाटकर यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र त्यानंतर मधुरिमाराजे यांच्या काही समर्थकांनी त्यांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांची महत्वाची भूमिका होती.
का भडकले सतेज पाटील?
हे ही वाचा >>Election 2024: "माझी राजकीय आत्महत्या...", बंडखोर नाना काटेंची निवडणुकीतून माघार, नेमकं काय घडलं?
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज मधुरिमाराजे छत्रपती या निवडणूक आयोगाकडे दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी कार्यालयात पोहोचल्या. अखेरच्याक्षणी त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सतेज पाटील यांचा पारा चांगलाच चढला. यावेळी सतेज पाटील यांनी तिथे उपस्थित असलेल्या मधुरिमाराजे यांच्या काही समर्थकांना थेट इशारा दिला. "हे फसवणूक केल्यासारखं झालंय... जर माघार घ्यायची होती, तर ती आधीच निर्णय घ्यायचा असता! आम्हाला कशाला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे बरोबर नाही... तुम्हाला सांगतोय... लक्षात ठेवा... तुम्ही जेवढ्यांनी आग लावली असेल, तुम्हाला सर्वांना सांगतोय" असं म्हणत सतेज पाटील रागात बाहेर निघून गेले.
छत्रपती शाहू महाराज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी परिसरात येताच अनेक कार्यकर्त्यांना काय नाटकं लावलेत ही असं म्हणत राग व्यक्त केला. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील यांनी देखील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना धारेवर धरत आपला राग व्यक्त करत या ठिकाणी निघून गेलेले आहेत. मधुरिमाराजे छत्रपती यांचा माघार घेतल्यानंतर माध्यमांना शाहू महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली.