Uddhav Thackeray: 'मंगळसूत्र, वोट जिहाद अन् नरेटिव्ह...', ठाकरेंनी चढवला PM मोदींवर हल्ला

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

udhhav thackeray criticize pm narendra modi on vote jihad maha vikas aghadi meeting maharashtra politics
नरेंद्र मोदींनी सांगितलं त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सानिध्यात गेलं.
social share
google news

Udhhav Thackeray on vote jihad : महाविकास आघाडीची आज वाय बी सेंटरमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray)  यांनी पंतप्रधान मोदींवर (Pm Narendra Modi) जोरदार हल्ला चढवला आहे. ''मोदींचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सानिध्यात गेलं. ते त्यांच्या घरी जेवले देखील आहेत.त्यामुळे ते खाल्ल्या मिठाला जागलेत की जागणार आहेत की नाही?'' असा सवाल केला आहे.(udhhav thackeray criticize pm narendr modi on vote jihad maha vikas aghadi meeting maharashtra politics) 

ADVERTISEMENT

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, ''वोट जिहाद म्हणजे काय? नरेंद्र मोदींनी सांगितलं त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सानिध्यात गेलं. त्यांच्या घरचे जेवण ते जेवायचे. आता ते खाल्ल्या मिठाला जागले आहेत की नाही हे मोदींनी सांगावं? लहाणपणी ते शेजारच्या कुटुंबियांकडे जेवण जेवत असतील तर त्या खाल्ल्या मिठाला जागलेत की जागणार आहेत की नाही,'' अशा शब्दात ठाकरेंनी मोदींना घेरलं. 

हे ही वाचा : 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला...', मनसे नेता संतापला!

ठाकरेंनी यावेळी नरेटिव्हच्या मुद्यांवरून देखील भाजपवर हल्ला चढवला. ''तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील. मंगळसुत्र उचलून नेतील. तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमची म्हैस चौरून नेतील,नकली संतान, नकली सेना हे काय खरे नरेटिव्ह होतं'', असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला केला. 

हे वाचलं का?

400 पारचा नारा मग का दिला होतात? आणि तुमच्याच लोकांनी ठरवलेलं संविधान बदलायचं आहे. मंगळसुत्र चोरणार, अच्छे दिने आयेंगे, 5 लाख खात्यात टाकणार, हे तर आपण विसरलो, त्या नरेटिव्हचं काय झालं? हे सगळं खोट नरेटिव्ह होतं,अशी टीकाही ठाकरेंनी भाजपवर केली. 

हे ही वाचा : शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, जप्त केलेली हाडे आणि अवशेष गायब

भाजपचा अजिंक्यपणा किती फोल आहे, हे जनतेने दाखवून दिलं. लोकसभा निवडणूक ही अंतिम नाही तर ही लढाई आता सुरु झाली आहे. विधानसभेची निवडणूक आता अधिक ताकदीने लढवू, असा विश्वास ठाकरेंनी यावेळी वक्त केला. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT