Sheena Bora Murder : शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, जप्त केलेली हाडे आणि अवशेष गायब
Sheena Bora Murder Case : 2012 मध्ये शीनाचा मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी पेण पोलिसांना अवशेष सापडले होते. त्या अवशेषाची पहिली चाचणी जे जे हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांनी केली होती. आणि हे अवशेष मानवी हाडांचे असल्याचा निष्कर्ष काढला होता.
ADVERTISEMENT
Sheena Bora Murder Case : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात 12 वर्षापुर्वी पेण पोलिसांनी जप्त केलेली हाडांचे अवशेष गायब झाल्याचे उघड झाले आहे. हे अवशेष शोधुनही सापडले नाहीत, अशी माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातला हा सर्वांत मोठा पुरावा होता. पण आता हाच पुरावा आता गायब झाल्याने खळबळ माजली आहे. (sheena bora murder case indrani mukherjee sanjeev khanna driver shyamvar rai evidence missing)
ADVERTISEMENT
शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. 2012 मध्ये शीनाचा मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी पेण पोलिसांना अवशेष सापडले होते. त्या अवशेषाची पहिली चाचणी जे जे हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांनी केली होती. आणि हे अवशेष मानवी हाडांचे असल्याचा निष्कर्ष काढला होता.
हे ही वाचा : 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला...', मनसे नेता संतापला!
दरम्यान गेल्या सुनावणीत सरकारी वकील सी.जे. नांदोडे यांनी पेण पोलिसांना 12 वर्षापुर्वी सापडलेल्या अवशेषाची ओळख पटवण्याच्या हेतूने ते अवशेष खान यांना दाखवण्याची मागणी केली होती. पण आता पेण पोलिसांनी जप्त केलेली हाडांचे अवशेष गायब झाल्याचे उघड झाले आहे. हे अवशेष शोधुनही सापडले नाहीत, अशी माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे.
हे वाचलं का?
दरम्यान फिर्यादी पक्षाने यापूर्वी हाडे शोधण्यासाठी वेळ मागितला होता. ज्याला बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध केला नाही. मात्र, त्या हाडे शोधण्यात फिर्यादीला अपयश आले. आता परिस्थिती अशी आहे की, हाडे पुरावा म्हणून सादर न करता केवळ डॉ. झेबा खान यांच्या साक्षीवर खटला चालवण्यास तयार आहे.
हे ही वाचा : 'मोदींच्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळाले तर...'; सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या!
प्रकरण काय?
2012 मध्ये शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी, माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनी गळा दाबून हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह पेण गावात नेऊन जाळण्यात आला होता. 2012 मध्ये पेण पोलिसांनी शीनाचे जप्त केलेले अवशेष जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. 2015 पर्यंत या प्रकरणाचा उलगडा झाला नाही, जेव्हा रायच्या अटकेने हा खून उघडकीस आला. कायदेतज्ज्ञांच्या मते हा महत्त्वाचा पुरावा गायब झाल्यास खटल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT