CM Shinde: 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला...', मनसे नेता CM शिंदेंवर संतापला!
Waqf Board: राज्य सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींची निधी देण्याची घोषणा केल्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Waqf Board and MNS: मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. ज्यापैकी 2 कोटी हे देण्यात ही आले त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अल्पसंख्याकांच्या मतांसाठी राज्य सरकार त्यांचं लांगुलचालन करत असल्याची टीका देखील आता शिंदे सरकारवर करण्यात येत आहे. अशातच मनसे नेते प्रकाश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवरच निशाणा साधलाय. 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला मदत करणं हे वाईट आहे', अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलीए. (mns leader prakash mahajan lashed out at chief minister eknath shinde after announcing Rs 10 crore fund for waqf board)
ADVERTISEMENT
'हिंदूंनी मोदींना लोकसभेत पाठबळ दिलं असतं तर वक्फ बोर्डच रद्द झाला असता'
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना थेट असं म्हटलं की, 'हिंदू लोकांनी मोदींना लोकसभेला तेवढं पाठबळ दिलं नाही.. पाठबळ दिलं असतं तर वक्फ बोर्डच रद्द झालं असतं.' पाहा या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले.
हे ही वाचा>> RSS: मोहन भागवत घेणार 'या' बड्या नेत्याची भेट, या भेटीचा अर्थ काय?
'जागोजागी थडगे, मशिदी, दर्गा, कबरी उभ्या राहिल्या आहेत. ज्याचा यांच्याशी काही संबंध नाही. त्या विशाळगडावर एवढी मोठी दर्गा उभा राहिली. इतिहासात त्याचा कुठेही उल्लेख नाही. ती दर्गा हटवायची असेल तर आम्हाला वक्फ बोर्डाकडेच जावं लागेल. हे किती चूक आहे.'
हे वाचलं का?
'म्हणजे वक्फ बोर्डच अन्याय करणार आणि न्याय मागायला आम्हाला वक्फ बोर्डाकडे जावं लागतं हा कोणता कायदा आहे. हे सगळं रद्द झालं पाहिजे.. वक्फ बोर्डच रद्द केला पाहिजे. मनसे म्हणून आम्हाला वाटतं.. कारण वक्फ बोर्डाला या देशाचे कायदे लागू होत नाही.'
'या देशात दोन स्वतंत्र घटना असल्यासारख्या आहेत. वक्फ बोर्डाने एखाद्याच्या जमिनीवर हक्क सांगितला तर त्या जमीनधारकाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाता येत नाही तर वक्फ बोर्डाकडे जावं लागतं.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Maharashtra Vidhan Sabha : ठाकरेंचा मोठा प्लॅन! स्वतंत्र लढण्याची तयारी! Inside Story
'वक्फ बोर्डाचे नियमच रद्द करायला पाहिजे. दुर्दैवाने हिंदू लोकांनी मोदींना लोकसभेला तेवढं पाठबळ दिलं नाही.. पाठबळ दिलं असतं तर वक्फ बोर्डच रद्द झाला असता. कारण या देशात रेल्वेनंतर सर्वात जास्त संपत्ती असलेला वक्फ बोर्ड आहे.'
ADVERTISEMENT
'अल्पसंख्याकांचं लांगुलचालन देखील असू शकतं. म्हणून मी थोडं विनोदी अंगाने म्हणतो की, माननीय मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलंय पण दाढीवाल्याला मदत करणं हे वाईट आहे..'
'मुख्यमंत्र्यांनीच चूक केली ना ही.. हा निधी देऊन चूक केली. त्यांनी त्वरीत निर्णय मागे घेतला पाहिजे. हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.' असं म्हणत प्रकाश महाजन यांनी याबाबत अगदी आक्रमक भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT