Vinod Tawde : भाजपचा विरोध असूनही नवाब मलिक यांना अजितदादांकडून उमेदवारी? तावडे म्हणाले आम्ही...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विनोद तावडे नवाब मलिकांबद्दल काय म्हणाले?

point

विनोद तावडेंची उद्धव ठाककरेंवर टीका

point

'मुंबई तक'च्या चावडीवर विनोद तावडे काय काय बोलले?

Vinod Tawde : राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवाब मलिक यांनी मुंबई तकच्या चावडीवर केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला सस्पेन्स चांगलाच वाढलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काहीही होऊ शकतं, कुणीही कुणासोबत दिसतं असं ते म्हटले होते. तर याच नवाब मलिक यांना तिकीट देण्यावरूनही मोठा अंतर्गत कलह महायुतीमध्ये झाला होता. नवाब मलिक यांना एकीकडे भाजपचा विरोध होता, मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी नवाब मलिक यांनाही तिकीट दिलं, सना मलिक यांनाही तिकीट दिलं. त्यावर विनोद तावडे यांनी मुंबई तकच्या चावडीवर आपली भूमिका स्पष्ट केली. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>PM Narendra Modi Dhule : एक है तो, सेफ है.... धुळ्याच्या सभेत मोदींचा नवा नारा, नेमका अर्थ काय?

भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. नवाब मलिक यांच्यावर काही महिन्यांपूर्वीच भाजपनेच गंभीर आरोप केलेले होते, मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी नवाब मलिक यांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसंच अजित पवार हे नवाब मलिक यांच्या प्रचारातही दिसणार आहेत. यावर विनोद तावडे म्हणाले की, त्या पक्षाने तो एक उमेदवार दिला म्हणून थेट युती तोडता येत नाहीत, मात्र पुढे काही गोष्टी होऊ शकतात. तसंच पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की, आम्हाला या प्रचाराला जाणार नाही.

हे वाचलं का?

 

दुसरीकडे झिशान सिद्दीकी हे सुद्धा आपल्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरणं टाळताना दिसतायत. तसंच त्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी झिशान सिद्दीकी यांनी बोलणं टाळलं. यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, झिशान सिद्दीकी यांना महायुतीचं तिकीट स्वीकारलं म्हणजे  महायुतीचं नेतृत्वही स्वीकारलं.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी युती तोडली नसती, तर राज्याचं चित्र खूप वेगळं असतं असं विनोद तावडे म्हणाले आहेत. मोदींच्या, भाजपच्या, हिंदुत्वाच्या  नावावर मतं घेऊन निवडून आले आणि त्यानंतर हिंदुत्वादाला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं असंत म्हणत टीका केली. 

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT