Maharashtra CM : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?

मुंबई तक

Maharashtra Next Chief Minister :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केलीय.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Eknath Shinde
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis (R) and CM Eknath Shinde (PTI/File)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्या नेत्याची होणार नियुक्ती?

point

महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच!

point

एकनाथ शिंदे पुन्हा होणार मुख्यमंत्री?

Maharashtra Next Chief Minister :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केलीय. कारण मागील निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. परंतु, यावेळी भाजपने 149 जागा लढवून 132 जागांवर बाजी मारली. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 81 जागांपैकी 55 जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या या दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा पार केलाय. अशातच मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. पण मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

महायुतीच्या मोठ्या विजयात भाजपची भूमिका महत्त्वाची असल्याचं समोर आलंय. परंतु, महायुतीला बहुमत मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जातंय. कारण एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत बंड करून भाजपला पाठिंबा दिल्यानंतरच महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी भाजपने शिंदे गटाला समर्थन देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. दुसरीकडे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. परंतु, यावेळी निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्याने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे. 

हे ही वाचा >> Raj Thackeray MNS : "भाजप सोबत जाणं ही चूक", मनसेच्या बैठकीत उमेदवारांकडून नाराजी - सूत्र

एकनाथ शिंदेंचं भविष्य काय असणार?

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सीएम पदावर असलेले शिंदेंच्या खांद्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल? असा सवाल उपस्थित झाला आहे. शिंदेंना मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा आहे. पण भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचंही बोललं जात आहे. ज्याच्या जास्त जागा असतील, त्याच पार्टीचा सीएम होईल, असा कोणताच फॉर्म्युला महायुतीत नाही, असं शिंदे म्हणाले होते. महायुतीचे नेते बैठक घेतील आणि त्यानंतर पुढील मुख्यमंत्री घोषित केला जाईल, असंही शिंदेंनी म्हटलंय. 

हे ही वाचा >> 25th November Gold Rate : मज्जाच मज्जा! निवडणूक संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण; मुंबईत आजचा भाव काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp