वर्दीतला देवमाणूस! रमजानचे उपवास सुरू असूनही ८ वर्षांच्या चिमुकलीला धावत नेलं रूग्णालयात

पुण्यातल्या वारजेमधली घटना, अपघात होताच पोलीस मदतीसाठी धावला
वर्दीतला देवमाणूस! रमजानचे उपवास सुरू असूनही ८ वर्षांच्या चिमुकलीला धावत नेलं रूग्णालयात

कोरोनाच्या काळात सगळ्या पोलिसांना आपण रात्रंदिवस झटताना पाहिलं आहे. बहुतांश लोकांच्या मदतीला हा वर्दीतील देवमाणूस आल्याचे पाहण्यास मिळाले आहे. कोरोना, लॉकडाऊनचा तो काळ आपण कधीही विसरू शकत नाही. आता दरवर्षी प्रमाणे यंदा रमजान महिना आहे. हा उपवास प्रत्येक मुस्लिम बांधव करीत असतो. त्यांच्यापैकीच एक समीर हे देखील आहेत. त्यांनाही महिनाभरासाठी रोजे (उपवास) ठेवले आहेत. तसंच ते आपले कर्तव्यही बजावत आहेत.

समीर यांनी रमजानचे उपवास सुरू असतानाही पुण्यातल्या वारजे पुलावर झालेल्या अपघातानंतर जी तत्परता दाखवली त्याचं कौतुक होतं आहे. झालं असं की पुण्यातल्या वारजे पुलावर अपघात झाला. या अपघातात एक ८ वर्षांची चिमुकली मुलगी जखमी झाली. समीर यांनी तातडीने त्या मुलीला खांद्यावर उचललं आणि रूग्णालय गाठलं. यामुळे तिचा जीव वाचला आहे. समीर यांच्या या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक होतं आहे.

पुण्यातल्या कोथरूड परिसरातील मनोज पुराणिक हे कुटुंबीयांसोबत वारजे पुलावरून प्रवास करीत होते. त्यावेळी पुराणिक यांच्या चार चाकी वाहनांला ट्रकने मागून जोरात धडक दिल्याची घटना घडली.या घटनेत गाडीत असलेले मनोज, त्यांची पत्नी आणि दोन मुले जखमी झाले. या अपघाताच्या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्याच दरम्यान तिथे वाहतूक पोलिस कर्मचारी समीर बागराज हे ड्युटीवर होते.तेथील परिस्थिती लक्षात घेता, समीर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ८ वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन रूग्णालयाच्या दिशेने पळत सुटले.तेवढ्यात एक रिक्षा तेथून जात असताना,आहो साहेब रिक्षात बसा आपण घेऊन जाऊयात, त्यावर समीर बाग सिरीज यांनी काही मिनिटात अरना या चिमुकलीला रूग्णालयात दाखल केले.

वेळीच समीर धावून आल्याने अरना चे प्राण वाचले असून पुराणिक कुटुंबीयांनी त्यांचे विशेष आभार मानले. या कामगिरी बाबत समीर बागराज यांच्याशी संवाद साधला असता,ते म्हणाले की, मी वारजे पुलाच्या तिथे ड्युटीवर असताना अपघात झाल्याचे दिसले. गाडी जवळ जाऊन पाहिले.तर चौघे जण जखमी असल्याचे दिसले काही सुचेनासे झाले.त्यावर गाडीतील 8 वर्षाच्या मुलीला उपचारासाठी धावत सुटले.तेव्हा एका रिक्षा वाल्याने मदत केल्याने रूग्णालया पर्यन्त पोहोचू शकलो.त्या बाळाचे प्राण वाचले याचे समाधान असून समाजात घटना घडल्यास नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.