मोठी बातमी: राज ठाकरेंच्या ‘त्या’ भाषणावर आजच कारवाई करणार: पोलीस महासंचालक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत जे भाषण केलं त्यावर कारवाई केली जाणार की नाही याविषयी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेबाबत काही कारवाई करायची असल्यास आजच केली जाईल. याप्रकरणाकडे औरंगाबादचे आयुक्त लक्ष ठेवून आहेत. असंही रजनीश शेठ म्हणाले.

पाहा पोलीस महासंचालक नेमकं काय म्हणाले:

‘कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश दिले आहेत. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्या भाषणाच्या अनुषंगाने जी आवश्यक कारवाई करायची आहे त्यासाठी ते सक्षम आहेत आणि ते ती करतील.’

‘कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्याविरोधात कडक कारवाई करु. आमच्या 87 एसआरपीएफ कंपन्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नका.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘राज ठाकरें नोटीस दिलेली आहे की नाही याबाबत तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्तांना विचारावं लागेल. त्याबाबत माझ्याकडे माहिती नाही.’

‘राज्यात मोठ्या प्रमाणात एसआरपीएफ आणि होमगार्ड तैनात आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे बंदोबस्तावर आहेत. आज ईद शांततेत पार पडली आहे.’

‘महाराष्ट्रातील पोलिसांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पोलीस हे रेडी मोडमध्ये आहेत. जे कोणी कायदा-सुव्यवस्था खराब करतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच.’

‘मी आपल्याला आधीच सांगितलं आहे की, औरंगाबाद पोलीस आयुक्त हे याची चौकशी करुन आवश्यक कारवाई आजच करतील. ते कारवाई करण्यात सक्षम आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे.’

‘मिशन राज/प्लान आर’ : मनसे नेत्यांना दिलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी काय दिलाय इशारा?

‘आम्ही सर्व समाजातील लोकांच्या बैठका घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी आम्ही शांतात कमिटी, मोहल्ला कमिटी यांच्या बैठका घेतल्या आहे. आम्ही लोकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी शांतता बाळगावी.’

‘आज ईदची जी नमाज अदा झाली ती देखील शांततेत पार पडली आहे. कुठेही अनुचित घटना घडलेली नाही.’ अशी माहिती यावेळी महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे.

यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT