Porn case: राज कुंद्राच्या अडचणींत भर, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी दाखल केला FIR
Porn Case : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरण बाहेर काढलं होतं. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटकही झाली होती आणि नंतर जामीनही मिळाला होता. आता. या प्रकरणी आता ईडीची एंट्री झाली आहे. राज कुंद्राच्या विरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी […]
ADVERTISEMENT

Porn Case : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील वर्षी पॉर्नोग्राफी प्रकरण बाहेर काढलं होतं. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटकही झाली होती आणि नंतर जामीनही मिळाला होता. आता. या प्रकरणी आता ईडीची एंट्री झाली आहे. राज कुंद्राच्या विरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या आहेत.
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी मुंबईत राज कुंद्रा पॉर्न प्रकरणामुळे अडचणीत आला होता. तसंच त्या सगळ्या प्रकरणाची चर्चाही झाली होती. आता मनी लाँड्रिंग प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. राज कुंद्राच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
२०२१ मध्ये राज कुंद्राला मुंबईच्या क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. राज कुंद्रावर हा आरोप आहे की फेब्रुवारी २०१९ कुंद्रान आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर हॉटशॉट नावाचं App विकसित केलं. हे हॉटशॉट अॅप राज कुंद्राने यु. के. स्थित फर्मला २५ हजार डॉलर्समध्ये विकलं होतं. या कंपनीचा सीईओ प्रदीप बक्षी हा राज कुंद्राचा मेहुणा आहे.