Loudspeakers Row : नियम मोडला, मुंबई पोलिसांनी दोन मशिदींविरुद्ध दाखल केला गुन्हा
भोंग्यांच्या वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकष ठरवून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील नुरानी मशीद आणि सांताक्रूझमधील लिंक रोडवर असलेल्या मुस्लीम कब्रस्तान मशिदीच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. “भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल या […]
ADVERTISEMENT

भोंग्यांच्या वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकष ठरवून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील नुरानी मशीद आणि सांताक्रूझमधील लिंक रोडवर असलेल्या मुस्लीम कब्रस्तान मशिदीच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
“भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
या प्रकरणाची माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितलं की, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंग्यांचा वापर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. त्याबरोबर दिवसाही डेसिबल मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.