Mumbai Bandstand : ‘मुलगी ओरडत राहिली, लाट आली अन्…’, फोटोच्या नादात गेला जीव
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बॅण्डस्टॅण्डवर पावसाळ्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एक महिला बुडाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला.
ADVERTISEMENT

Mumbai jyoti sonar video : काठावर उभी असलेली मुलगी आई-आई म्हणून ओरडत होती. पण, प्रचंड लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत असताना पती-पत्नी फोटो काढण्यातच मग्न होते अन् तिथेच घात झाला. अचानक मोठी लाट आली आणि किनाऱ्यावरील दगडावर बसलेल्या महिलेला घेऊन गेली. क्षर्णाधात महिला पाण्यात गडप झाली आणि मुलीच्या आक्रोशाने किनारा हादरला. मुंबईतील बॅण्डस्टॅण्ड समुद्रात पती सोबत फोटो काढताना महिला बुडाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (woman swept away in bandra bandstand video)
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बॅण्डस्टॅण्डवर पावसाळ्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुट्टीच्या निमित्ताने अनेक लोक किनाऱ्यावर येऊन खाली दगडांवर जाऊन फोटो काढतात. पण, अनेकांचा घात होतो. अशीच घटना समोर आलीये.
वाचा >> अजित पवारांकडे अर्थ खातं पण प्रत्येक फाईल जाणार फडणवीसांकडे?, नेमकं राजकारण काय?
बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एक महिला बुडाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक हळहळ व्यक्त करत आहे. तर काही जण मुलीचं तरी ऐकायचं होतं, म्हणत आहेत.
लाट आली आणि महिला बुडाली, बॅण्डस्टॅण्डला काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओ दिसत आहे की, एक जोडप किनाऱ्यावर असलेल्या दगडावर बसलेले आहे. किनाऱ्यावर येऊ धडकणाऱ्या लाटांचा आनंद ते घेत असल्याचे दिसत आहे.










