BMC Election : ‘डोळे लावून ध्यान करत होतात का?’ दानवे-शेलारांमध्ये काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

expressway toll collection issue : aaditya thackeray, ashish shelar and ambadas danve tweets.
expressway toll collection issue : aaditya thackeray, ashish shelar and ambadas danve tweets.
social share
google news

Mumbai Politics : मुंबई महापालिका निवडणूक कधी लागणार, हे अजूनही निश्चित नसलं तरी मोर्चेबांधणी जोरात सुरूये. मुंबईतील राजकारण तापताना दिसत असून, ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप, असा कलगीतुरा बघायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईतील टोलचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लक्ष्य केले. शेलारांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएसआरडीसीने बृहन्मुंबई महापालिकेकडे दिले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती महापालिका करते. टोल मात्र एमएसआरडीसी वसूल करते, असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. या मार्गावरील टोल बंद करण्याची मागणीही आदित्य ठाकरेंनी केलीये.

आदित्य ठाकरेंनी टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी त्याला उत्तर दिलं. शेलारांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि आदित्य ठाकरेंना युवराज असा टोला लगावत पलटवार केलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

युवराज म्हणत आदित्य ठाकरेंना टोला

शेलारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत रस्त्यावर खड्डे पडले. मुंबईची तुंबई झाली. अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले. 26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली. झाड पडून काहीजण गेले. संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले. तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा.”

वाचा >> ‘मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग फेडताहेत का?’, ठाकरे अमित शाहांवर का भडकले?

“आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका! मुंबईकर हो! म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, लबाड लांडगा ढोंग करतोय मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय”, अशी टीका शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केलीये.

ADVERTISEMENT

शेलारांना अंबादास दानवेंनी काय दिलं उत्तर?

आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उत्तर दिलं. जगातील सर्वात मोठा पक्ष असं उपरोधिकपणे म्हणत दानवेंनी शेलारांना सुनावलं.

ADVERTISEMENT

Aaditya Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येणार?, काकांचा विषय पुतण्याने उचलला; म्हणाले, “टोल नाके…”

विरोधी पक्षनेते दानवेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही”, असे प्रत्युत्तर दानवेंनी शेलारांना दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT