Ganesh Visarjan 2023 Mumbai : ‘…आता डोळे भरुन आलेत बाप्पा तुला पाहुन जाताना’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

ganpati visarjan 2023 in marathi ganpati visarjan 2023 mumbai ganpati visarjan 2023 pune lalbaugcha raja visarjan live mumbaicha raja visarjan live
ganpati visarjan 2023 in marathi ganpati visarjan 2023 mumbai ganpati visarjan 2023 pune lalbaugcha raja visarjan live mumbaicha raja visarjan live
social share
google news

Ganesh Galli Raja, Lalbaugcha Raja Visarjan 2023 : गेले दहा दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोपाची वेळ झाली आणि भक्तांच्या मनाची घालमेल सुरू झाली. ढोल ताशांचा गजर… सकाळ संध्याकाळ आरती अन् बाप्पाला नैवेद्याचा पाहुणाचार केल्यानंतर आज (28 सप्टेंबर) गणपती आपल्या भक्तांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे

‘निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना…

अशीच अवस्था बाप्पांच्या भक्तांची झालीये….

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात सर्वच शहरांत गणरायाला निरोप देण्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी सकाळीच मिरवणुकांना सुरुवात झाली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक जळगावसह विविध शहरात गणरायाला जड अंतःकरणाने भक्त निरोप देणार असून, पोलिसांनी तयारी केली आहे.

मुंबईत मिरवणुका सुरू…

ADVERTISEMENT

मुंबईत सकाळी आठ वाजताच गणपती मिरवणुकांना सुरूवात झाली. मुंबईचा राजा गणपतीच्या मिरवणूक सकाळी सुरु करण्यात आली. तर पुण्यातही दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती मूळ मंदिरात नेण्यात आली. लालबागचा राजा गणपतीची मिरवणूकही सुरू झाली असून, मुंबईत मोठा बंदोबस्त पोलिसांकडून करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

16 हजार पोलीस मदतीने… 7 हजार सीसीटीव्ही… आणि AI, मुंबई पोलिस गणेश विसर्जनासाठी सज्ज

यंदा गणेश विसर्जन आणि ईद एकाच दिवशी आहे. मुंबईतील गणेश विसर्जन आणि ई या दोन्ही सणांसाठी मुंबई पोलिसांनी तयारी केली असून विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. सुरक्षेसाठी 16 हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआयच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. 28 सप्टेंबर रोजी मुंबईत 5 हजारांहून अधिक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (ganesh visarjan 2023 traffic restrictions in mumbai)

हेही वाचा >> Deepak Kesarkar: ‘मला 25 कोटींची ऑफर पण…’, केसरकरांच्या वक्तव्यामुळे खळबळ

पाच हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच ईदही आहे. अशा स्थितीत पोलिसांसमोर सुरक्षा व्यवस्था राखणे मोठे आव्हान असेल. यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तयारी केली आहे.

हेही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार! असं आहे सुनावणी वेळापत्रक

गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सात हजार सीसीटीव्ही आणि एआय तंत्रज्ञान कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आयुक्त, विशेष आयुक्त, सहआयुक्त, 8 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 25 पोलिस उपायुक्त, 45 सहायक पोलिस आयुक्तांसह 2866 पोलिस अधिकारी आणि 16250 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. SRPF च्या 35 प्लाटून, R.P.F. प्लाटून, क्यूआरटी टीम, आरएएफ कंपनी, होमगार्ड्सही तैनात करण्यात आले आहेत.

73 नैसर्गिक विसर्जन स्थळे, 62 कृत्रिम तलाव

मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले, “शहरात गिरगाव, दादर, जुहू, मार्वे, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त 162 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

तात्पुरता नियंत्रण कक्ष बांधला

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन स्थळे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत आणि मोठ्या विसर्जन स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. यंत्रसामग्रीसह तात्पुरता नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच, वाहतूक विभाग वाहनांच्या हालचालींचे व्यवस्थापन करेल. वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी विभागाने योग्य ती पावले उचलली आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT