Mumbai News: आधी हमरीतुमरी, नंतर थेट चाकूने वार... मुंबईच्या रस्त्यावर घडला भयंकर कांड!
मुंबईतील विक्रोळी शहरात ओव्हरटेकिंगच्या किरकोळ वादामुळे व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 34 वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
किरकोळ वादाचं जीवघेण्या हल्ल्यात रूपांतर
ओव्हरटेकिंगच्या वादातून तरुणाची हत्या
चाकू हल्ल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू
Mumbai Crime: मुंबईतील विक्रोळी शहरात रविवारी (25 मे रोजी) किरकोळ वादामुळे जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यावेळी एका किरकोळ वादाचं रुपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 34 वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख जीशान रफीक शेख असल्याची सांगितली जात आहे. पोलीस अधिकऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही व्यक्ती विक्रोळी परिसरात कार डीलरचं काम करत होती.
ओव्हरटेकिंगमुळे झाला वाद
न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, जीशान त्याच्या मित्रासोबत कुर्ल्याला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यादरम्यान, रस्त्यात ओव्हरटेकिंगमुळे एका स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीसोबत जीशानचा वाद झाला. त्या स्कूटरवर मागे एक महिला सुद्धा बसली होती. मात्र, या किरकोळ वादाने रौद्ररूप धारण करण्यास सुरूवात केली आणि स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीने धारदार शस्त्राने जीशानवर हल्ला केला.
हे ही वाचा: भुयारी मेट्रोचा पहिल्याच पावसात खेळखंडोबा! मुंबईकरांचा संताप, प्रशासनावर चिडले
चाकूने झालेल्या हल्ल्यात जीशान गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी खून आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे.









