Mumbai Bandstand : ‘मुलगी ओरडत राहिली, लाट आली अन्…’, फोटोच्या नादात गेला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

woman swept away in bandra bandstand video
woman swept away in bandra bandstand video
social share
google news

Mumbai jyoti sonar video : काठावर उभी असलेली मुलगी आई-आई म्हणून ओरडत होती. पण, प्रचंड लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत असताना पती-पत्नी फोटो काढण्यातच मग्न होते अन् तिथेच घात झाला. अचानक मोठी लाट आली आणि किनाऱ्यावरील दगडावर बसलेल्या महिलेला घेऊन गेली. क्षर्णाधात महिला पाण्यात गडप झाली आणि मुलीच्या आक्रोशाने किनारा हादरला. मुंबईतील बॅण्डस्टॅण्ड समुद्रात पती सोबत फोटो काढताना महिला बुडाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (woman swept away in bandra bandstand video)

ADVERTISEMENT

मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या बॅण्डस्टॅण्डवर पावसाळ्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुट्टीच्या निमित्ताने अनेक लोक किनाऱ्यावर येऊन खाली दगडांवर जाऊन फोटो काढतात. पण, अनेकांचा घात होतो. अशीच घटना समोर आलीये.

वाचा >> अजित पवारांकडे अर्थ खातं पण प्रत्येक फाईल जाणार फडणवीसांकडे?, नेमकं राजकारण काय?

बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एक महिला बुडाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक हळहळ व्यक्त करत आहे. तर काही जण मुलीचं तरी ऐकायचं होतं, म्हणत आहेत.

हे वाचलं का?

लाट आली आणि महिला बुडाली, बॅण्डस्टॅण्डला काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओ दिसत आहे की, एक जोडप किनाऱ्यावर असलेल्या दगडावर बसलेले आहे. किनाऱ्यावर येऊ धडकणाऱ्या लाटांचा आनंद ते घेत असल्याचे दिसत आहे.

वाचा >> Maharashtra Politics: शिंदे-अजित पवारांवर मतदार प्रचंड नाराज?, सर्व्हेतून धक्कादायक खुलासे

दुसरीकडे त्याचवेळी या जोडप्याची छोटी मुलगी याचा व्हिडीओ बनवत होती. या व्हिडीओत मुलीचा आवाजही स्पष्ट ऐकायला येत आहे. लाटा वाढताना दिसत आहे. लाट आदळल्यानंतर दोघेही एकमेकांना पकडताना दिसत आहेत. पण, त्यानंतर एक मोठी लाट येते आणि महिलेला घेऊन जाते.

ADVERTISEMENT

पती आणि मुलगी बघतच राहिले

मोठी लाट आदळल्यानंतर महिला पाण्यात पडते. तिचा पती तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण, तोपर्यंत महिला समुद्रात वाहून जाते. तर छोटी मुलगी मम्मी… मम्मी म्हणून ओरडत असल्याचे दिसत आहे. महिला वाहून गेल्यानंतर पती आणि मुलगी फक्त बघतच राहिले.

ADVERTISEMENT

वाहून गेलेली महिला कोण?

बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात वाहून गेलेल्या महिलेबद्दल माहिती समोर आलीये. त्या महिलेचे नाव ज्योती सोनार असं असून, 32 वर्षांची होती. महिलेचा पती नवी मुंबईतील रबाळेमध्ये गौतम नगरमध्ये खासगी कंपनी टेक्निशियन म्हणून काम करतो.

महिलेच्या पतीने सांगितलं की, “मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. चौथ्या लाट मोठी होती आणि संतुलन बिघडलं. त्यानंतर आम्ही दोघेही घसरलो. मी तिची साडी पकडली. त्याचवेळी एका व्यक्तीने माझा पाय पकडला. पण, मी तिला वाचवू शकलो नाही. माझी मुलं ओरडत होती, पण कुणी काहीच करू शकलं नाही. मुलं या धक्क्यातून कसे सावरतील मला माहिती नाही”, असं महिलेच्या पतीने सांगितलं.

वाचा >> Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

सायंकाळी 5.12 वाजता लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. रविवारी रात्री उशिरा महिलेचा मृतदेह सापडला. रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT