MU Senate Election : अमित ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्ला, खरमरीत पत्रात काय?
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित : राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका. राज्यपालांना लिहिलं पत्र.
ADVERTISEMENT

Mumbai University Senate Election News : मुंबई विद्यापिठाने 10 जागांसाठी होऊ घातलेली सिनेट निवडणूक स्थगित केली. विद्यापीठाच्या या निर्णयानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात काही सवाल उपस्थित करत अमित ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना लक्ष्य केले आहे. (Amit Thackeray letter to governor ramesh bais)
अमित ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना लिहिलेलं पत्र
राज्यपाल रमेश बैस याना लिहिलेल्या पत्रात अमित ठाकरेंनी म्हटलं आहे की, “मुंबई विद्यापिठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक ‘पुढील आदेश’ येईपर्यंत विद्यापिठाने स्थगित करण अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार, 18 ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते.”
“केवळ 12 तास आधी, काल (17 ऑगस्ट) रात्री 11 च्या सुमारास विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं.”
वाचा >> Mumbai University Senate Election : ‘ठाकरे’ लढणार होते विरोधात, पण येणार एकत्र?
“अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली, हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापिठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही”, असा संताप अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.