Mumbai University Senate Election : ‘ठाकरे’ लढणार होते विरोधात, पण येणार एकत्र?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai university senate election news : administration stayed on election
mumbai university senate election news : administration stayed on election
social share
google news

Mumbai University Senate Election News in marathi : मुंबईतील राजकारण पुन्हा एका निवडणुकीच्या पेटलंय. आधीच मुंबई बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक कधी लागणार, हे अजूनही अंधातरीच आहे. त्यात घोषित करण्यात आलेली निवडणूकच स्थगित करण्यात आली. त्यामुळे एकमेकांना पराभवाची धूळ चारण्यासाठी मोर्चे बांधणी करणाऱ्या दोन्ही ठाकरेंना आता एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवण्याची वेळ आलीये.

ADVERTISEMENT

मुद्दा आहे मुंबई विद्यापिठाच्या सिनेट निवडणुकीचा. मुंबई विद्यापीठातील 10 सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. 9 ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. 18 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पुढच्या महिन्यात म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होतं, तर 18 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता.

जवळपास 95 हजार मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते. पण, एका रात्रीमध्ये सगळा गेम पलटला. मुंबई विद्यापिठाने रातोरात सिनेटची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुका पुन्हा कधी होणार? यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसलं तरी एकमेकांच्या विरोधात लढणारे आता एकमेंकांच्या सोबत येऊन मुद्दा मांडताना दिसत आहेत.

हे वाचलं का?

युवा सेना, मनविसेने काय म्हटलंय?

मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयावर युवा सेनेचे वरुण देसाई म्हणाले की, “मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करून टाकली! निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर असे करणे हे बेकायदेशीर आणि घाबरटपणाचे लक्षण आहे. आपण जिंकणार नाही म्हणून कोणत्याच निवडणूका नकोत, अगदी विद्यापीठाच्या पण नकोत हे लोकशाहीला प्रचंड घातक आहे.”

वाचा >> NCP Crisis : अजित पवारांना मिळणार घड्याळ चिन्ह? शरद पवार तसे का बोलले?

दुसरीकडे मनसे नेते अखिल चित्रे म्हणाले, “सिनेट निवडणुकाही अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सत्ताधाऱ्यांना बहुधा कोणत्याच निवडणुका नको आहेत, स्वतः जिंकण्याची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय निवडणूक घ्यायचीच नाही. अजून किती दिवस वास्तवापासून दूर जाणार… ही पराभवाची धास्ती की सत्तेची मस्ती…!”

ADVERTISEMENT

दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही राज्य सरकारवरच तोफ डागलीये. “सिनेट निवडणुका रद्द करणे म्हणजे कुठल्याच निवडणुका घ्यायच्या नाहीत या हुकूमशाही प्रवृत्तीच्या दृष्टीने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे”, असे ते म्हणालेत.

सिनेट निवडणुकीवर ठाकरे गटाचे अंकित प्रभू म्हणाले, “मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करणे म्हणजे निवडणुकीतून पळ काढणे. कोणतीही निवडणुका न घेऊन लोकशाहीची गळचेपी सतत केली जात आहे. पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. जेव्हा कधी निवडणूक घ्याल तेव्हा तुम्हाला मतपेटीतून धडा शिकवेल.”

ADVERTISEMENT

वाचा >> Exclusive: भाजप अजितदादांना संपवणार,रोहित पवारांचं खळबळजनक वक्तव्य

पुढे ढकललेल्या निवडणुकीवर मनसे नेते गजानन काळे म्हणतात, “मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आज मध्येच तात्काळ त्याला स्थगिती देण्यात येते ही काय मोगलाई आहे का? ही लोकशाही आहे का? सरकारला निवडणुकांची इतकी का भीती ? मुंबई विद्यापिठावर कोणाचा दबाव आहे ? अचानक बैठक का? याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काचे मुंबई विद्यापीठ हे सरकारच्या मनमानीचा अड्डा बनू देणार नाही, निषेध!”

अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे

ज्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे नेते आता निवडणूक स्थगित झाल्यामुळे एकत्र येऊन सरकारविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत, या निवडणुकीत मनविसेची जबाबदारी अमित ठाकरेंकडे आहे. दुसरीकडे युवा सेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एकमेकांच्या विरोधात लढणारे दोन नेते आता निवडणूक स्थगित झाल्यानंतर एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात एकत्र येताना दिसण्याचीच शक्यता वाढलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT