RS Polls : नवाब मलिक-अनिल देशमुखांची मतदानासंदर्भातली विनंती याचिका कोर्टाने फेटाळली

विद्या

राज्यसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात एक एक मतासाठी जुळवाजुळव सुरू आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेजण दोन आरोपांखाली तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावं ही विनंती या दोघांनीही कोर्टाला केली होती. मात्र कोर्टाने ठाकरे सरकारला धक्का दिला असून आता या दोघांचीही मतदानाला जाता यावं ही याचिका फेटाळली आहे. १० जून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात एक एक मतासाठी जुळवाजुळव सुरू आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेजण दोन आरोपांखाली तुरुंगात आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावं ही विनंती या दोघांनीही कोर्टाला केली होती. मात्र कोर्टाने ठाकरे सरकारला धक्का दिला असून आता या दोघांचीही मतदानाला जाता यावं ही याचिका फेटाळली आहे. १० जून म्हणजेच शुक्रवारी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाला या दोघांनाही जाता येणार नाही. कोर्टाने या दोघांचीही विनंती याचिका फेटाळली आहे.

एक एक मत महत्त्वाचं मानलं जात असताना राष्ट्रवादीसाठी या दोन नेत्यांची याचिका फेटाळली जाणं धक्का मानलं जातं आहे. हायकोर्टात जाण्याचा पर्याय या दोघांकडे आहे. मात्र ईडीने उत्तर नोंद करण्यासाठी आणखी वेळ मागितला तर मात्र या दोघांना दिलासा मिळणं कठीण होणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं दिसतं आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघेजण रूग्णालयात आहे. भाजपने या दोघांना मुंबईत आणलं आहे. या दोघांनाही रूग्णवाहिकेतून मतदानासाठी आणलं जाणार आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनाही कोर्टाने संमती दिलेली नाही. एक-एक मत महत्त्वाचं असताना हा महाविकास आघाडीसाठी हा धक्का मानला जातो आहे.

१० जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधल्या कलम ६२ नुसार कैदेत असणाऱ्या व्यक्तीसाठी हा औपचारिक अधिकार आहे तो मुलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे कैदेत असलेल्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी संमती देऊ नये असं ईडीने म्हटलं आहे.