Sanjay Raut : राऊत लोकसभा लढवणार, शिवसेनेने (UBT) मतदारसंघही ठरवला!
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय राऊत निवडणूक लढवण्याची शक्यता. शिवसेनेने (UBT) मतदारसंघही सूचवला. त्यामुळे आता राऊतांच्या निर्णयाकडे लक्ष.
ADVERTISEMENT
Sanjay Raut Lok sabha Election 2024 : खासदार संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आलीये. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेने (UBT) संजय राऊतांनी कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी हेही निश्चित केलंय. द इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने संजय राऊतांच्या हवाल्याने वृत्त दिलंय.
ADVERTISEMENT
शिवसेनेत फूट पडल्यानंतर बंडखोर आमदारांकडून संजय राऊतांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं जातंय. पण, हे आव्हानाला संजय राऊत सामोर जाण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या निवडणुकीसंदर्भातील एक बातमी समोर आलीये.
वाचा >> Dilip Walse Patil : पहिला वार! शरद पवारांची वळसे-पाटलांनी काढली ‘उंची’
संजय राऊत यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबद्दल पक्षाने म्हटलं आहे, असं राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
या वृत्तावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, “पक्षाने आदेश दिला, तर आम्ही काहीही करतो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल, तो मानणाऱ्यांपैकी मी आणि माझं कुटुंब आहे.”
वाचा >> Rajiv Gandhi Life Story: व्हायचं होतं पायलट, पण बनले पंतप्रधान; कशी झाली होती राजकारणात एन्ट्री?
“आज काही वृत्तपत्रात बातम्या आल्यात. त्यांनी मला प्रश्न केलेला की, तुम्ही निवडून लढणार का? मी त्यांना सांगितलं की, पक्षाने आदेश दिला तर मी काहीही करेन. पण, ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या. आमचा साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी तो किमान दोन ते सव्वा दोन लाख मतांनी विजयी होईल, अशी ईशान्य मुंबईची स्थिती आहे”, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची स्थिती
सध्या या मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. किरीट सोमय्या यांच्याऐवजी 2019 मध्ये भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती आणि ते जिंकून आले. मनोज कोटक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे होता, तर आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचा विरोध अन् सोमय्यांची उमेदवारी गेली
2019 मध्ये शिवसेनेने युतीतील जागावाटपावेळी किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास युतीतून बाहेर पडण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यामुळे भाजपला ऐनवेळी सोमय्या ऐवजी मनोज कोटक यांना तिकीट द्यावं लागलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT