मुंबई Tak जय हिंद उत्सव: आयुष्यावर बोलू काही... संदीप-सलीलचा LIVE कार्यक्रम
Mumbai Tak Jai Hind Utsav Ayushyavar Bolu Kahi: मुंबई Tak जय हिंद उत्सवाची सांगता ही संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या गीतकार-संगीतकार जोडीच्या सुप्रसिद्ध आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाने होत आहे.
ADVERTISEMENT

आयुष्यावर बोलू काही... संदीप-सलीलचा LIVE कार्यक्रम
पुणे: मुंबई Tak जय हिंद उत्सव या विशेष कार्यक्रमाचं आज (23 मे) पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं आहे. इंडिया टुडे (India Today) ग्रुपची मराठी डिजिटल वाहिनी मुंबई Tak वर
आपल्याला हा कार्यक्रम पाहता येईल. दरम्यान, आता कार्यक्रमाची सांगता ही पुण्याच्या गीतकार-संगीतकार जोडी असलेल्या संदीप-सलील यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाने होणार आहे. ज्यामध्ये सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचं गारूड आजही अवघ्या महाराष्ट्रावर आहे. त्यामुळे पुण्यात होत असलेल्या या कार्यक्रमाची सांगता ही या पुणेकरांच्या कार्यक्रमाने होत आहे.