पनवेलमध्ये विसर्जन घाटावर ११ जणांना विजेचा धक्का : ९ महिन्यांची चिमुरडीही जखमी

गणेश विसर्जनादरम्यान राज्यात मोठी दुर्घटना...
Electric Shock on ganesh visarjan mirvanuk
Electric Shock on ganesh visarjan mirvanuk Mumbai Tak

मुंबई : राज्यातील विविध शहरांमध्ये अद्यापही गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात सुरु असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान, पनवेलमधील विसर्जन घाटावर मोठी दुर्घटना घडली आहे. पनवेलच्या कोळीवाडा गणेश विसर्जन घाटावरती जनरेटरमधील वायर तुटून तब्बल 11 जणांना विजेचा धक्का बसला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पनवेलच्या लाईफ लाईन आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, पनवेलमधील वडघर कोळीवाडा विसर्जन घाटावर भाविकांसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जोरदार पाऊसामुळे जनरेटरची एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली आणि त्याला शॉक लागला. त्यावेळी त्याला मदत करण्यासाठी कुटुंबीयांनीही संबंधित तरुणाला स्पर्श केला. त्यामुळे कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसला.

Electric Shock on ganesh visarjan mirvanuk
पुणे - इंदापूरमध्ये टोकाचे विरोधक झाले गणपती बाप्पाच्या पालखीचे भोई

घटनेतील जखमींमध्ये हर्षद पनवेलकर (32), रुपाली पनवेलकर (35), रितेश पनवेलकर (38), सर्वेम पनवेलकर (15), दिलीप पनवेलकर (65), दिपाली पनवेलकर (24), तनिष्का पनवेलकर (9 महिने, निहाल चोणकर (5), वेदांत कुंभार (18), मानस कुंभार (17), दर्शना शिवशिवकर (36) यांचा समावेश आहे.

Electric Shock on ganesh visarjan mirvanuk
कोल्हापूर : डॉल्बीवरुन पोलिसांचे नियमावर बोट; कार्यकर्त्यांचा रात्रभर रस्त्यावर मुक्काम

घटना घडली तेव्हा घटनास्थळी महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी धावाधाव करुन भाविकांना वेळीच रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, पनवेलचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी रुग्णालयात धाव घेतली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in