महाराष्ट्रात दिवसभरात 11 हजारांहून अधिक Corona रूग्णांना डिस्चार्ज, 163 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 11 हजार 32 रूग्णांना कोरोनातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 57 लाख 53 हजार 290 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.93 टक्के इतके झाले आहे. दिवसभरात 11 हजार 66 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 163 मृत्यूंची नोंद झाली आहे. […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 11 हजार 32 रूग्णांना कोरोनातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 57 लाख 53 हजार 290 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.93 टक्के इतके झाले आहे. दिवसभरात 11 हजार 66 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 163 मृत्यूंची नोंद झाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 1 लाख 28 हजार 355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 97 हजार 587 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या 5 लाख 92 हजार 108 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 223 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 1 लाख 21 हजार 859 सक्रिय रूग्ण आहेत.
Corona Delta+ व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात अद्याप एकही मृत्यू नाही, राजेश टोपे यांची माहिती
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. आज 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.