बुलढाणा : इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा, चोरट्यांकडून दुकान मालकाची हत्या

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, पोलीस तपास सुरु
बुलढाणा : इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा, चोरट्यांकडून दुकान मालकाची हत्या

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात मंगळवारी रात्री १० वाजता एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या घटनेत दोन्ही चोरट्यांनी दुकानमालकाची हत्या करुन घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. हत्येचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

चिखळी शहरातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट हे मंगळवारी रात्री १० वाजता आपलं दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. आपल्या हातातली पैश्यांची थैली ठेवत असताना अचानक दुकानात दोन व्यक्ती घुसल्या. यातील एकाच्या हातात बंदुक तर दुसऱ्याच्या हातात तलवार होती. पोपट यांना काही कळायच्या आतच दोन्ही चोरट्यांनी त्यांच्यावर शस्त्राने वार करत त्यांना जखमी केलं.

बुलढाणा : इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा, चोरट्यांकडून दुकान मालकाची हत्या
कडबा कटिंग मशीनमध्ये केस अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

पोपट यांनी आपल्याजवळील पैशांची थैली वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतू तलवार असलेल्या आरोपीने पोपट यांच्या पोटात सपासप वार करत त्यांना जखमी करत पैशांची पिशवी घेऊन घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी जाताना चोरट्यांनी पोपट यांच्या गळ्यातली सोन्याची चेनही खेचून घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या पोपट यांनी फोनवरुन आपल्या नातेवाईकांना याबद्दलची माहिती दिली.

बुलढाणा : इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा, चोरट्यांकडून दुकान मालकाची हत्या
पंढरपूर : पत्नी आणि मुलीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला अटक

पोपट यांच्या नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतू तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा तपास सुरु केला आहे.

बुलढाणा : इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा, चोरट्यांकडून दुकान मालकाची हत्या
दुर्घटनेत जायबंदी झाला पत्नीचा हात, पतीने सव्वा लाखाची सुपारी देऊन बायकोला संपवलं

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in