मोठी बातमी : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!
Appasaheb Dharmadhikari | Maharashtra Bhushan : मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः धर्माधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी २००८ साली त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. […]
ADVERTISEMENT

Appasaheb Dharmadhikari | Maharashtra Bhushan :
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः धर्माधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी २००८ साली त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. (‘Maharashtra Bhushan’ award announced to Appasaheb Dharmadhikari)
#BreakingNews
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 8, 2023
समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमत् दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून लोकांचे निरुपण करण्यासाठी दिवंगत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र डॉ. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ओळखलं जातं. श्री सदस्यांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभं करणं, तसंच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे धर्माधिकारी कुटुंबियांचं मूळ कार्य. “श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग” माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी १९४३ सालापासून या कार्याची सुरुवात केली होती.