राज्यात २८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; १३ जणांना मिळाली मुंबईत पोस्टिंग

वाचा कोणत्या अधिकाऱ्याला कुठे मिळाली पोस्टिंग?
Fresh order on transfer of 28 Police officers
Fresh order on transfer of 28 Police officersMumbai Tak

मुंबई : राज्यात २८ उपआयुक्त आणि अधिक्षक दर्जाच्या एकूण २८ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ जणांना मुंबईमध्ये पोस्टिंग मिळाली आहे. गृह विभागाने शनिवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश जारी केले. शिंदे-फडणवीस सरकारने मागील काही दिवसात प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु केले आहे. नुकतेच काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या.

पोलीस उप आयुक्तांचे - विद्यमान पदस्थापना - बृहन्मुंबई अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळाने दिलेली पदस्थापना

 • कृषाकात उपाध्याय - परिमंडळ ६ - गुन्हे शाखा (प्रकटीकरण १)

 • बालसिंग रजपूत - गुन्हे शाखा (प्रतिबंधक) - सायबर गुन्हे

 • प्रशांत कदम - परिमंडळ ७ - गुन्हे शाखा प्रकटीकरण)

 • राजू भुजबळ - गुन्हे शाखा - (अंमलबजावणी)- वाहतूक (पूर्व उपनगरे)

 • विनायक ढाकणे - वाहतूक (पूर्व) - सशस्त्र पोलीस नायगांव

 • हेमराज राजपूत - सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कालिना - परिमंडळ-६

 • संजय लाटकर - सुरक्षा - बंदर परिमंडळ

 • डी. एस. स्वामी - परिमंडळ ८ - गुन्हे शाखा (अंमलबजावणी)

 • प्रकाश जाधव - आर्थिक गुन्हे विभाग - अंमली पदार्थ विरोधी पक्ष

 • संग्रामसिंह निशाणदार - गुन्हे शाखा (प्रकटीकरण) - आर्थिक गुन्हे विभाग

 • विशाल ठाकूर - परिमंडळ ११ - अभियान

 • प्रज्ञा जेडगे - वाहतूक (दक्षिण)- सशस्त्र पोलीस ताडदेव

 • योगेशकुमार गुप्ता - परिमंडळ ३ - जलद प्रतिसाद पथक

 • शाम घुगे - जलद प्रतिसाद पथक - सुरक्षा

 • नितीन पवार - वाहतूक (पश्चिम उपनगरे) - सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कालिना

पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्तांचे नाव - विद्यमान पदस्थापना - बृहन्मुंबई अंतर्गत पोलीस आस्थापना मंडळाने दिलेली पदस्थापना

 • अभिनव दिलीपराव देशमुख - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - परिमंडळ - २

 • अनिल सुभाष पारसकर - उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई - परिमंडळ- ९

 • एम. रामकुमार - उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई - मुख्यालय - १

 • मनोज पाटील - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - परिमंडळ ५

 • गौरव सिंग - पोलीस अधिक्षक, म.पो.अकॅडमी, नाशिक - वाहतूक (दक्षिण)

 • तेजस्वी बा. सातपुते - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - मुख्यालय-२

 • प्रविण मुंढे - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - परिमंडळ-४

 • दिक्षीतकुमार गेडाम - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - परिमंडळ-८

 • मंगेश शिंदे - समादेशक, रारापो बल गट क्र. २ पुणे - वाहतूक (पश्चिम उपनगरे)

 • अजयकुमार बन्सल - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - परिमंडळ - ११

 • मोहित कुमार गर्ग - पदस्थापनेच्या प्रतिक्षेत - गुन्हे शाखा (प्रतिबंधक)

 • पुरुषोत्तम कराड - पोलीस उप आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई - परिमंडळ-७

 • अकबर पठाण - पोलीस अधीक्षक, ना.इ.स. नाशिक - परिमंडळ-३

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in