नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमरावतीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात ६५ वर्षीय वृद्धाने एका ७० वर्षीय महिलेवर अतिप्रसंग केला आहे. या घटनेबद्दल पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रीच्या वेळीत घरात किराणा माल संपल्यामुळे बाहेर सामान आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी साहेबराव इंगळे पीडित महिलेला वाटेत भेटला. तुम्हाला घरी सोडून येतो या बहाण्याने आरोपीने महिलेला जवळच असलेल्या संत्र्याच्या बागेत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला.
या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची सध्या अकोल्यात सर्वत्र चर्चा होते आहे.