चार महिन्यापूर्वी बेपत्ता झाला तरूण, चुलत भावानेच खून करून मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक बाब उघड

पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातली धक्कादायक घटना समोर
चार महिन्यापूर्वी बेपत्ता झाला तरूण, चुलत भावानेच खून करून मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक बाब उघड

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातून चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवकाचा त्याच्याच चुलत भावाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला कोणताही पुरावा नसताना अटक केली आहे.

चार महिन्यापूर्वी बेपत्ता झाला तरूण, चुलत भावानेच खून करून मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक बाब उघड
बीड: खळबळजनक... 6 वर्षाच्या बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या

याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्याची उकल केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेटफळगडे येथील सुजित संभाजी जगताप हा बत्तीस वर्षाचा युवक 23 ऑगस्ट 2019 रोजी शेतात कामाला जातो असे सांगून गावातून अचानक बेपत्ता झाला होता. बराच शोध घेतल्यानंतर ही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

(प्रातिनिधिक फोटो)

पोलीस तपासात पोलिसांनी मयत सुजित याचा चुलतभाऊ किशोर बाळासाहेब जगताप याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक बाबींच्या आधारे संशय बळावल्याने पोलिसी खाक्या दाखवताच 21 ऑगस्ट 2021 रोजी सुजीतला उसाच्या शेतात घेऊन त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.

खून केल्यानंतर सुजितचा मृतदेह एका पोत्यात भरून उसाच्या शेतात पुरल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आहे. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अधिक तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in