समीर वानखेडे-क्रांती रेडकरच्या घरात चोरी; लाखोंची रक्कम अन् दागिन्यांवर डल्ला
मुंबई (दिपेश त्रिपाठी) : कॉडिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या घरी चोरी झाल्याचं समोर येत आहे. घरातील काम करणाऱ्या महिलेनेचं चोरी करुन पोबारा केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु […]
ADVERTISEMENT

मुंबई (दिपेश त्रिपाठी) :
कॉडिलिया क्रूझवरील ड्रग पार्टीनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या घरी चोरी झाल्याचं समोर येत आहे. घरातील काम करणाऱ्या महिलेनेचं चोरी करुन पोबारा केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या घरातून जवळपास साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा यात समावेश आहे. चोरी झाल्याचं उघडकीस येताच घरातील काम करणारी महिला गायब असून तिनेच हात साफ केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे.
क्रांतीने काही दिवसांपूर्वीच एका एजन्सीच्या माध्यमातून घर कामासाठी एका महिलेला कामावर घेतलं होतं. क्रांतीच्या तक्रारीनंतर पोलीस सध्या याच एजन्सीमध्ये संबंधित महिलेबद्दल चौकशी करत आहेत. संबंधित महिला नेमकी कुठली, कामावर ठेवण्यापूर्वी तिची पोलीस चौकशी झाली होती का, एजन्सीला कायदेशीर मान्यता आहे का? यापूर्वी अशा काही तक्रारी आल्या आहेत का? अशा अॅन्गलने पोलीस सध्या तपास करत आहेत.