तब्बल १० वर्षांनंतर Income Tax भरती घोटाळा उघड; ९ अधिकाऱ्यांचा असा झाला भांडाफोड

मुंबई तक

नागपूर : येथे तब्बल ९ वर्षांनंतर आयकर विभागातील एक भरती घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा उघड होताच सीबीआयने ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व अधिकारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २०१२-१४ दरम्यान झालेल्या परीक्षांमधून भरती झाले होते. या घटनेमुळे अधिकारी वर्गांत आणि परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये स्टेनोग्राफर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपूर : येथे तब्बल ९ वर्षांनंतर आयकर विभागातील एक भरती घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा उघड होताच सीबीआयने ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व अधिकारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २०१२-१४ दरम्यान झालेल्या परीक्षांमधून भरती झाले होते. या घटनेमुळे अधिकारी वर्गांत आणि परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार, मनीष कुमार आणि धर्मेंद्र कुमार यांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून या ९ अधिकाऱ्यांची पोलीस उपायुक्त संदीप चौगले यांच्या नेतृत्वात चौकशी सुरु केली होती. चौकशीदरम्यान, हे ९ जण २०१२-२०१४ दरम्यानच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत बसले नव्हते. ९ डमी उमेदवारांना त्यांच्या जागेवर बसवण्यात आल्याचं उघड झालं.

चौकशीदरम्यान, संबंधित उमेदवारांचे हस्ताक्षर, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे परीक्षेवेळी आणि नोकरी कालावधीत वेगवेगळे आढळून आले. त्यावरुन आता या ९ अधिकाऱ्यांविरोधात आयपीसी कलम ४१६, ४१७, ४२०, ४६४ एल, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच सर्वांना अटकही करण्यात आली असून विशेष सीबीआय न्यायालयाने या अधिकाऱ्यांना १६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp