अकोला: पोटच्या अल्पवयीन मुलीवर सलग 2 वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
धन्ंजय साबळे, अकोला: स्वत:च्या पोटच्या अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांनी आरोपी पित्याला जन्मठेपेसह दोन लाख 75 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. माना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील आरोपी वडिलांची स्वत:च्याच मुलीवर वाईट नजर पडली आणि आरोपीने अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी […]
ADVERTISEMENT

धन्ंजय साबळे, अकोला: स्वत:च्या पोटच्या अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांनी आरोपी पित्याला जन्मठेपेसह दोन लाख 75 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
माना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील आरोपी वडिलांची स्वत:च्याच मुलीवर वाईट नजर पडली आणि आरोपीने अवघ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित केले. 2017 ते 2019 दरम्यान नराधम आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
मुलीच्या तक्रारीनुसार वडिलांविरुद्ध माना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी वडिलांविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केलं होतं. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात याबाबतचा संपूर्ण खटला चालला.
यावेळी न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 8 साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी वडिलांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. भादंवि कलम 376(2) (F) (1)(N) व पॉक्सो कायदा कलम 5-6 मध्ये दोषी ठरवून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली व कलम 376 (3) मध्ये 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व विविध कलमांतर्गत 2 लाख 75 हजार रुपये दंड सुनावला. तसेच दंड न भरल्यास प्रत्येक कलमानुसार सहा महिन्यांची शिक्षाही सुनावली आहे.