भारतात आता २४ तास घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस-डॉ. हर्षवर्धन
सोमवारपासून म्हणजेच १ मार्चपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या लसीकरणाची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली आहे. आता चोवीस तास भारतीयांना लस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगितलं आहे की आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना, […]
ADVERTISEMENT

सोमवारपासून म्हणजेच १ मार्चपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या लसीकरणाची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली आहे. आता चोवीस तास भारतीयांना लस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगितलं आहे की आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना, सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम आणि स्टेट हेल्थ इन्शुरन्स योजनेत सहभागी असलेल्या सर्व खासगी रूग्णालयांनी मोठ्या क्षमतेने लसीकरण सुरू करावं. तसंच खासगी रूग्णालयांमध्येही २४ तास लसीकरण होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकार ने #vaccination की रफ़्तार बढ़ाने के लिए समय की बाध्यता समाप्त कर दी है। देश के नागरिक अब 24×7अपनी सुविधानुसार टीका लगवा सकते हैं।
PM श्री @narendramodi जी देश के नागरिकों के स्वास्थ्य के साथ-साथ उनके समय की कीमत बखूबी समझते हैं।#VaccineAppropriateBehavior pic.twitter.com/cpKVlXurvL
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) March 3, 2021
हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
“कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने चालावी यासाठी सरकारने वेळेची मर्यादा रद्द केली आहे. आता देशातले नागरिक २४ तास कोरोनाला प्रतिबंध करणारी लस घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील नागरिकांच्या आरोग्यसोबतच त्यांच्या वेळेचीही किंमत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.”