Maharashtra Violence : अमरावतीत चार दिवस कर्फ्यू; शहरातील इंटरनेट सेवाही बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावती, नांदेड, मालेगावात हिंसक वळण लागलं. अमरावतीत सलग दुसऱ्या कालही (१३ नोव्हेंबर) हिंसाचाराचा भडका उडला. दोन समोरासमोर आल्यानंतर दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच चार दिवसांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Internet services were shut down and a four-day curfew was imposed in Amravati)

अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी बंदची हाक दिली. मात्र, बंदला हिंसक वळण लागलं. दुपारपर्यंत शहरात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. त्याचबरोबर पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांना धीर दिला. त्याचबरोबर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

Maharashtra violence : अमरावतीत पुन्हा हिसेंचा भडका; दगडफेक-जाळपोळ, संचारबंदी लागू

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही हिंसेचा भडका उडाल्यानं अमरावती प्रशासनानं सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी खबरदारीचं पाऊल म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर दूरसंचार कंपन्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील इंटरनेट सेवा बंद केली. पुढील तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने शनिवारी (१३ नोव्हेंबर) कर्फ्यू (कलम १४४) लागू केला. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील चार दिवस कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

Maharashtra Violenc: दोषींवर कठोर कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा हिंसा करणाऱ्यांना इशारा

ADVERTISEMENT

पालकमंत्र्यांची सर्वधर्मीय नेत्यांशी चर्चा

शनिवारीही अमरावती शहरात हिंसेचा उद्रेक झाल्यानं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली. त्याचबरोबर शहरातील तणाव निवळण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व धर्मीय नेत्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात झालेल्या बैठकीतही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व पक्षीय नेत्यांना शांतता प्रस्थापित करण्याबद्दल आवाहन केलं.

शनिवारी काय झालं?

शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनेचा निषेध करण्यासाठी भाजपानं बंद पुकारण्याचं आवाहन केलं. राजकमल चौकात दोन्ही बाजूचा जमाव आमने-सामने आला. त्यानंतर काही वेळातच दोन्ही गटांनी एकमेकांच्या दिशेनं दगडफेक करण्यास सुरूवात केली. हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला. यावेळी काही समाजकंटकांनी दुकानांना आग लावल्याचाही प्रकार घडला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT