वाझे, पालांडे आणि शिंदे CBI च्या कोठडीत, रुग्णालयात असलेल्या देशमुखांना तुर्तास दिलासा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आज सीबीआय कोर्टात तात्पुरता दिलासा दिला आहे. अनिल देशमुख वगळता सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार होत असल्यामुळे सीबीआयने त्यांची कोठडी सीबीआयकडे देण्यास नकार दिला आहे.

सीबीआयकडून कोर्टात राजमोहन चंद, रत्नदीप सिंह आणि सुमेध वानखेडे या तीन वकिलांनी बाजू मांडली. सीबीआयच्या वकिलांनी या प्रकरणात अनिल देशमुखांविरुद्ध गंभीर आरोप असल्याचं कोर्टाला सांगितलं. “देशमुखांवर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत असताना इतर आरोपी म्हणजेच सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा या प्रकरणातला सहभाग समोर आला. यांना ठराविक रक्कम गोळा करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. महिन्याकाठी १ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात काही गंभीर बाबी समोर आल्या असून त्या आता कोर्टासमोर मांडता येणार नाहीत”, असंही सीबीआयच्या वकीलांनी सांगितलं.

आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीदारांच्या जबाबात काही विसंगती अनिल देशमुख या प्रकरणात अटक टाळत आहेत. यासाठीच त्यांनी स्वतःला जे.जे. रुग्णालयात दाखल करवून घेतल्याचा युक्तीवाद सीबीआयच्या वकीलांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१ एप्रिलला कोर्टाने या प्रकरणात सीबीआयला तपासाचे आदेश दिल्यानंतर जेल अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर लगेचच दोन एप्रिलला अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, हे काय आहे? त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच आम्हालाही धक्का बसला. हा पूर्णपणे अटक टाळण्याचा प्रकार असल्याचं सीबीआयने कोर्टासमोर सांगितलं.

दरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाझे, पालांडे आणि शिंदे यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी मंजूर केली आहे. परंतू अनिल देशमुखांना महाराष्ट्राबाहेर नेऊन तपास करण्याबाबतची सीबीआयची विनंती कोर्टाने फेटाळली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT