iPhone 13 बाजारात! किंमत किती? भारतात कधीपासून मिळणार...

iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max : व्हर्च्युअल कार्यक्रमात चार मॉडल लॉन्च
आयफोन-१३.
आयफोन-१३.

अॅपल ग्राहकांचं लक्ष लागलेला iPhone 13 अखेर लॉन्च करण्यात आला. एका व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे कंपनीनं नवीन उत्पादन मंगळवारी लॉन्च केली. यात आयफोन सीरीजबरोबर आयपॅड, आयपॅड मिनी, अॅपल वॉच सीरीज ७ आदींचा समावेश आहे. जुन्या आयफोनच्या तुलनेत नवीन आयफोन अधिक अॅडव्हान्स (अदययावत) आहे.

आयफोन १३ मिनी व आयफोन १३ भारतात २४ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आयफोन १३ प्रो हा ३० ऑक्टोबर, तर आयफोन १३ प्रो मॅक्स हा १३ नोव्हेंबरपासून भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.

अॅपलने आयफोन १३ सीरीजचे ४ मॉडेल लॉन्च केले आहेत. यात आयफोन १३ मिनी, आयफोन १३, आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स आदींचा समावेश आहे. अॅपलने आयफोन १३ मिनी आणि आयफोन १३ यांना एका श्रेणीत ठेवलं आहे.

आयफोन १३ मिनीमध्ये ५.४ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले असून, रेझ्युलेशन 2340x1080 पिक्सल आहे. तर आयफोन १३ मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले असून, त्याचं रेझ्युलेशन 2532x1170 पिक्सल, तर डेनसिटी 476ppi आहे. दोन्हीचे मॉडेल अॅल्यमिनियम डिझाईनमध्ये आहे. हे दोन्ही मॉडेल लाल, स्टारलाईट, मिडनाईट, ब्लू आणि गुलाबी रंगात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

आयफोन १३ प्रो आणि आयफोन १३ प्रो मॅक्स

आयफोन १३ प्रो मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. 2532x1170 पिक्सल रेझ्युलेशन असून, डेनसिटी 460ppi आहे. तर दुसरीकडे आयफोन प्रो मॅक्स मध्ये ६.७ इंच सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. रेझ्युलेशन 2778x1284 पिक्सल, तर डेनसिटी 458ppi आहे.

दोन्ही मॉडेलमध्ये (आयफोन १३ प्रो व आयफोन १३ प्रो मॅक्स) १२ मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फी कॅमेरा १२ मेगापिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी यात पोट्रेड मोड, बोकेड इफेक्ट आणि डेप्थ कंट्रोलचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in