मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास

इंदापूर तालुक्यातील घटना : 'मुलाला मारू नको', म्हटल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास

मुलांच्या शिक्षण आणि भविष्याबद्दल अलिकडे पालक बरीच काळजी घेतात. ट्यूशनपासून ते अभ्यास घेण्यापर्यंत लक्ष दिलं जातं. पण, मुलाच्या अभ्यास घेण्यावरूनच पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि पत्नीने थेट गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडला आहे.

मुलांचा अभ्यास घेताना पत्नी मुलगावर रागावली म्हणून पतीने पत्नीला रागावून बोलला आणि त्यामुळे निराश झालेल्या पत्नीने बेडरुममध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास
37 वर्षीय पत्रकाराची पत्नी आणि तीन मुलींच्या देखत चाकूचे वार करून हत्या

का झाला वाद?

रोहिणी राकेश थोरात (वय 25) असं मयत विवाहितेचं नाव आहे. तर राकेश थोरात असं पतीचं नाव आहे. या घटनेबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकची माहिती दिली. रोहिणी थोरात यांचे पती राकेश थोरात कामावरुन घरी आले, त्यावेळी रोहिणी या मुलाचा अभ्यास घेत होत्या.

मुलगा नीट अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी यांनी त्याला हाताने मारहाण केली. हे बघितल्यानंतर राकेश थोरात यांनी मध्ये हस्तक्षेप करून 'अभ्यासासाठी मुलाला मारू नको, असं रोहिणी यांना रागाच्या स्वरात म्हणाले. त्यानंतर त्यांनी मुलाला जवळ घेतलं.

मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास
डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरण : 'या' कारणामुळे करण्यात आला खून; धक्कादायक बाब आली समोर

त्यावरून रोहिणी नाराज झाल्या. 'तुम्हीच मुलाला लाडावून ठेवलं आहे. त्याचा अभ्यास तुम्हीच घ्या', असं म्हणत रोहिणी नाराज झाल्या.

मुलाच्या भवितव्यासाठी अभ्यास घेत असून, नवरा रागावल्याने त्यांनी अचानक टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनंतर रोहिणी यांनी बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाचा अभ्यास घेण्यावरून पती रागावला; पत्नीने बेडरुममध्ये घेतला गळफास
पत्नीवर भर रस्त्यात चाकूचे वार, नंतर स्वतःवरही झाडली गोळी; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास भिगवण पोलिसांकडून केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in