SRK’s Son: आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन, NCB समोर ढसाढसा रडला!

मुंबई तक

मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने त्याला रविवारी अटक केली आहे. तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. चौकशी आर्यन खान हा पूर्णपणे हतबल झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. या चौकशीत आर्यनने कबूल केलं आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने त्याला रविवारी अटक केली आहे. तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणात त्याची चौकशी केली जात आहे. चौकशी आर्यन खान हा पूर्णपणे हतबल झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. या चौकशीत आर्यनने कबूल केलं आहे की, तो तब्बल 4 वर्षापासून ड्रग्सचं सेवन करत होता. दरम्यान, चौकशी सुरु असताना आर्यनला आपले अश्रू आवरता येत नव्हते आणि तो वारंवार रडत होता.

शाहरुखसोबत आर्यनची फोनवरुन बातचीत

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने त्याचा मुलगा आर्यनशी फोनवर बोलला आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी त्यांच्या लँडलाईन फोनवरून सुमारे 2 मिनिटे बोलण्यास परवानगी दिली होती.

देशाबाहेर असतानाही केलं आहे ड्रग्सचं सेवन

हे वाचलं का?

    follow whatsapp