बारामती: वडिलांसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलगा आणि मुलीकडून महिलेची हत्या
वसंत मोरे, बारामती वडिलांशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने बहिण-भावाने मिळून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली. एवढेच नाही तर खुनाचा गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी मृत महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनावही आरोपी भाऊ-बहीणने रचला होता. दरम्यान, पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे आणि सखोल तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी आरोपी बहीण आणि भावाविरुद्ध […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, बारामती
वडिलांशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने बहिण-भावाने मिळून एका महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये उघडकीस आली. एवढेच नाही तर खुनाचा गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी मृत महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनावही आरोपी भाऊ-बहीणने रचला होता.
दरम्यान, पोलिसांनी अतिशय चाणाक्षपणे आणि सखोल तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी आरोपी बहीण आणि भावाविरुद्ध तब्बल 22 दिवसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश प्रमोद फडतरे आणि अनुजा प्रमोद फडतरे (रा. नगर, जि. बारामती) या दोन भावंडांना अटक केली आहे. याप्रकरणी सुनील रामदास पवार (रा. पवारवस्ती, शारदानगर, मालेगाव खुर्द) या डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.