बारामती: देवीच्या मंदिराचे दरवाजे तोडून दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
बारामती: बारामती तालुक्यातल्या प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून मध्यरात्री देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. मंदिरातील चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मुकुट, गळ्यातले दागिने आणि वस्त्रालंकाराचा समावेश आहे. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पंचनामा करुन चोरीचा […]
ADVERTISEMENT

बारामती: बारामती तालुक्यातल्या प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून मध्यरात्री देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे.
मंदिरातील चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मुकुट, गळ्यातले दागिने आणि वस्त्रालंकाराचा समावेश आहे. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पंचनामा करुन चोरीचा तपास सुरू केला आहे.
बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. या गावातील हे मंदिर प्रसिद्ध असल्याने अनेक भाविक या मंदिराला नेहमीच भेट देत असतात.
राज्यभरात हे मंदिर आणि गाव बरंच प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असताना शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.