बीड: जिवंतपणीच पतीकडून मरणयातना! पत्नीला तब्बल चार वर्षांपासून ठेवलं डांबून, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड

चारित्र्यावर संशय घेऊन अनेक टोकाच्या घटना घडताना ऐकायला, वाचायला मिळतात. काही घटनांमध्ये थेट समोरच्या व्यक्तीलाच संपवल्याचंही घडतं. मात्र, बीडमध्ये घडलेली घटना ऐकायला नंतर अंगावर शहारे येतील. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला तब्बल चार वर्ष डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षा पासून डांबून ठेवल्याची घटना बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आली आहे. विकृतीचा कळस म्हणजे महिलेला मारहाण देखील करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पतीच्या या वृत्तीमुळे दोन्ही मुलंही दहशतीखाली वावरत असल्याचं या प्रकारानंतर समोर आलं. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली.

सुटका केल्यानंतर महिलेची अवस्था पाहून सुटका करणाऱ्यांच्याही डोळे पाणावले. गेल्या पंधरा वर्षापासून पतीकडून अमानुष अत्याचार सुरू होता.

ADVERTISEMENT

सुरुवातीचे दोन-तीन वर्ष आनंदात गेल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पतीने त्रास द्यायला सुरुवात केली. “एका दुकानावर कामाला जात होती, मात्र पतीला माझ्यावर संशय आल्याने ते देखील बंद झालं. गेल्या १७ वर्षांपासून मला बाहेर जाऊ देत नाहीत. संशय घेतात. पाच-सहा वर्षांपूर्वी घराच्या बाहेर आले होते, त्यानंतर आज बाहेर निघाले. माझी मुलं आहेत. मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात देत मारहाण देखील केली,” असं सांगताना पीडितेला अश्रू अनावर झाले.

बीड शहरातील रूपाली किन्हीकर या महिलेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. बीड शहरातील जालना रोड शेजारी राहणाऱ्या रूपाली मनोज किन्हीकर या महिलेचा २० वर्षांपूर्वी मनोज यांच्याशी विवाह झाला.

ADVERTISEMENT

“घराच्या बाहेरही पती निघू देत नव्हता. इतकंच नाही, तर वडील मरण पावले तेव्हा अंत्यविधीला देखील जाऊ दिले नाही. पोटच्या मुलांना देखील त्रास देत असून, हा माणूस नाही हा हैवान आहे. महिलेला कोंडून ठेवलं, हे आम्ही गेल्या १० वर्षांपासून पाहतोय. खुप सुंदर असलेली महिला आज ८० वर्षांची दिसतेय,” महिलेच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं सांगितलं.

शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. “सामान्य माणूस पाच मिनिटंही उभं राहू शकणार नाही, अशा ठिकाणी पीडित महिला व तिची दोन मुलं राहत होती. त्यांची आम्ही सुटका केली असून, पीडित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे,” असं पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी सांगितलं. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल,” असं देखील त्यांनी सांगितलं.

“रुपाली दिसायला सुंदर असल्यामुळे तिचा नवरा तिच्यावर संशय घेत असून, गेल्या १७ वर्षांपासून वर्षापासून तिला मारहाण करत होता. घरात डांबून ठेवलं. मागच्या चार-पाच वर्षांपूर्वी तुला बाहेर काढायचा मी फोन केला होता, मात्र तिला धमकी दिल्यामुळे पुन्हा त्रास सुरू झाला. रूपालीच्या अंगावरती जखमा आहेत. महिलेला चालता येत नाही, त्यामुळे त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. संगीता धसे यांनी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT