PM मोदींसमोरच Kalyan Singh यांच्या पार्थिवावरील तिरंग्यावर BJPचा झेंडा, विरोधकांकडून तुफान टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांच्या अंतिम दर्शनादरम्यान त्यांच्या पार्थिववर तिरंग्यावर भाजपचा झेंडा ठेवण्यात आल्याने आता यावरुन वादंग सुरु झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि तृणमूल या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने तर भाजपवर जोरदार टीका केली आहे.

‘आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः’ अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं.’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केली आहे.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाल्यानंतर, त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी लखनौ येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: लखनौमधून येऊन कल्याण सिंह यांचं अंतिम दर्शन घेतलं. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यादरम्यान सुरुवातीला कल्याण सिंह यांचे पार्थिव तिरंग्याने गुंडाळण्यात आले होते. पण नंतर याच तिरंगा ध्वजावर भाजपचा झेंडा टाकण्यात आला. जेव्हा ही बाब समोर आली तेव्हापासून विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींच्या समोर भाजपच्या नेत्यांनी भारतीय तिरंगा ध्वजाचा अपमान केल्याचं आता म्हटलं जात आहे.

‘भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला’, NCP ची जोरदार टीका

ADVERTISEMENT

“आधी देश,मग पक्ष,शेवटी स्वतः”अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या निधनानंतर त्यांना अभिवादन करत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या ध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला.’

ADVERTISEMENT

‘विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच भारतीय ध्वजाचा हा अवमान झाला. प्रोटोकॉलप्रमाणे भारतीय ध्वजावर अन्य कोणताही ध्वज ठेवता येत नाही. ‘नेशन फर्स्ट’ ही घोषणा जनतेला फसवून केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा उद्धार करणाऱ्यांनीच आज उघडी पाडली. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचा निषेध व्यक्त करत आहे.’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर केली आहे.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी देखील कल्याण सिंह अंतिम दर्शनातील काही फोटो ट्विट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. रॉय यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये भाजपचे अनेक नेते दिसत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह हे अंतिम दर्शनावेळी हजर होते. याशिवाय काँग्रेसने देखील भाजपच्या या कृतीवर आक्षेप घेत टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री Kalyan Singh यांचं निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान-हिमाचलचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या दीड महिन्यांपासून कल्याण सिंह यांना लखनौच्या एसजीपीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT