Lok Sabha : कुणी EVM जाळलं, तर कुणाची हत्या..., तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी काय काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election third phase votin evm burn in sangola kolhapur senior citizen dies sambhajinagar evm hack
मतदान सूरू असताना अनेक ठिकाणी मतदानात व्यत्यय आणणाऱ्या घटना घडल्या.
social share
google news

Lok Sabha Election Third Phase Voting : राज्यातील 11 मतदार संघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान यशस्वीरीत्या पार पडलं आहे. मात्र हे मतदान सूरू असताना अनेक ठिकाणी मतदानात व्यत्यय आणणाऱ्या घटना घडल्या. जसं सांगोल्यात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झाला. तर उस्मानाबादमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकाची हत्या करण्यात आल्याची ही घटना घडली आहे. यासह मतदानात व्यत्यय आणणाऱ्या अनेक घटना घडल्या आहे. नेमक्य या घटना काय आहेत. त्या जाणून घेऊयात.  (lok sabha election third phase votin evm burn in sangola kolhapur senior citizen dies sambhajinagar evm hack)

सांगोल्यात EVM मशीन जाळली

माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्या तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदार केंद्रावरती तरूणाने ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ  ताब्यात घेऊन अटक केली आहे. संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांगोला पोलीस ठाण्यात सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

हे ही वाचा : 'महाराष्ट्रात 'एवढ्या' जागा मिळतील', CM शिंदेंनी आकडाच सांगितला

कोल्हापूरात मतदानाच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू

कोल्हापुरात मतदानासाठी आलेल्या उत्तरेश्वर पेठेतील रहिवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर पेठेतील मतदान केंद्राबाहेर ही घटना घडली. महादेव सुतार (69) वर्षीय असं त्यां व्यक्तीचं नाव आहे. त्यांना तातडीन उपचारासाठी सीपीआर सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 कोल्हापुरातील महादेव सुतार हे ६९ वर्षीय व्यक्ती पत्नी दोन मुलं सुना मुलगी यांच्यासह शिंगणापूर इथ राहतात. त्यांचं जुनं घर उत्तरेश्वर पेठेतील काळभैरव मंदिरा नजीक आहे. आज लोकसभेसाठी मतदान असल्यान महादेव सुतार हे कुटुंबीयांसह सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जुन्या घरी आले होते. तिथून साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुतण्यांसोबत ते शुक्रवार गेट नजीकच्या रमाबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रावर आले. पुतण्यांनी त्यांची मतदानासाठीची स्लिप देखील घेतली. दरम्यान अचानक चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले. मतदानासाठी आलेले नागरिक आणि केंद्रावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या कालावधीत ते बेशुद्ध झाल्यान त्यांना नातेवाईकांनी तातडीन सीपीआरमध्ये दाखल केलं. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सीपीआर मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.उन्हाच्या तडाख्यामुळच चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा उत्तरेश्वर पेठेत सुरू होती.

संभाजीनगरमध्ये ईव्हीएम हँकींगचा प्रयत्न 

संभाजीनगर ईव्हीएम हँकींगची घटना घडली आहे. या प्रकरणी आता  ईव्हीएम हॅक करणाऱ्या आरोपीला संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारोती नाथा ढाकणे (42 वर्षीय) असं ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. संभाजीनगर मधील एका राजकिय पक्षाच्या बड्या नेत्याने त्याला ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर दिली होती. दरम्यान ईव्हीएम हॅक करणाऱ्या 42 वर्षीय आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले  आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Baramati: 'रोहित पवार इतका पोहोचलेला...' पैसै वाटपावर अजित पवार हे काय बोलून गेले?

हातकणंगलेत हाणामारी धक्काबुक्की...

हातकणंगलेमध्ये 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे काही उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून बोगस प्रतिनिधी हे अनेक केंद्रांवरती ठाण मांडून असल्याने हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार प्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी धक्काबुकीचा प्रकार घडल्याची घटना घडली. हातकंनगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुती चे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडी चे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत  जोरदार राडा झाला. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला. 

ADVERTISEMENT

 उस्मानाबादमध्ये ठाकरेच्या शिवसैंनिकाची हत्या 

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रावर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. वैयक्तिक कारणावरून वाद झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे, पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात मतदान झाले. भूम तालुक्यातील पाटसावंगी गावात दोन गटात वाद झाला. यात समाधान नानासाहेब पाटील (वय 27) याचा मृत्यू झाला. 

भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी या घटनेबद्दलची माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार, पाटसांगवी गावात ही घटना घडली. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्राबाहेर गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे (वय 23) आणि समाधान नानासाहेब पाटील (वय 27) आणि त्याचा एक मित्र असा तिघांमध्ये वाद झाला. सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. गौरव उर्फ लाल्या आप्पा नाईकनवरे याने धारदार हत्याराने सदर दोघांना मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्वरित घटनास्थळावर पोलीस व पाटसांगवी गावातील नागरिक आले व त्यांनी सदर दोन्ही जखमींना औषध उपचारासाठी बार्शी जिल्हा सोलापूर येथे वाहनाने रवाना केले आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT