Suresh Khade | Sangli : लाखोंच्या उधळपट्टीनं सजवलं पालकमंत्री खाडेंचं कार्यालय? नेमकं प्रकरण काय, वाचा सविस्तर

मुंबई तक

(Sangli | Suresh Khade | BJP) सांगली : राज्य सरकारच्या सुचनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी सुसज्ज कार्यालय तयार करण्यात आलं आहे. जवळपास ३५ लाख रुपयांचा खर्च हे कार्यालय तयार करण्यासाठी आला आहे. मात्र ही सजावट म्हणजे जिल्हा नियोजन निधीतील गैरवापर असल्याचा आरोप होऊ लागला आहे. एकीकडे निधीच्या कमतरतेअभावी जिल्ह्यातील बरेचसे प्रकल्प आणि विकासकामं रखडली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

(Sangli | Suresh Khade | BJP)

सांगली : राज्य सरकारच्या सुचनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी सुसज्ज कार्यालय तयार करण्यात आलं आहे. जवळपास ३५ लाख रुपयांचा खर्च हे कार्यालय तयार करण्यासाठी आला आहे. मात्र ही सजावट म्हणजे जिल्हा नियोजन निधीतील गैरवापर असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

एकीकडे निधीच्या कमतरतेअभावी जिल्ह्यातील बरेचसे प्रकल्प आणि विकासकामं रखडली आहेत. असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरील खर्च हा उधळपट्टी असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सुयोग औंधकर यांनी केला आहे.

राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांचे कार्यालय असले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सांगलीच्या मध्यवर्ती शासकीय इमारतीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासाठी सुसज्ज कार्यालय तयार करण्यात आलं आहे. यात उंची महागडे फर्निचर, भिंतीऐवजी सागवानी वुडन वॉल्स, फ्लोरिंग, महागडे पंखे खुर्ची आणि सोफे अशा गोष्टींचा वापर या कार्यालयात करण्यात आला आहे.

अंतर्गत सजावटीसाठी महागडे झुंबर वापरले असून, कार्यालयाचा आवार सजविण्यावरही मोठा निधी खर्च करण्यात आला आहे. कार्यालयाच्या सुरुवातीला मोठे खांब, कमान उभी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यालयाच्या झुंबराचेच काम सुरू आहे. या दालनात लावण्यात आलेल्या पंख्याची किंमत ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत सांगितली जात आहे. ही व्हीआयपी ट्रीटमेंट पाहून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

प्रत्यक्षात खाडे यांचे वास्तव्य सांगलीत खूपच कमी असते. आठवड्यातील 5 दिवस ते मुंबईत असतात. शनिवारी आणि रविवारी सांगलीत आल्यानंतर ते मिरजमधील त्यांच्या संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे या कार्यालयात ते थांबणार किती काळ हाही प्रश्न विचारला जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp