डॉक्टरच करत होता रेमडेसिवीरचा काळा बाजार, सापळा रचून पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

मुंबई तक

यवतमाळ: कोरोनावरील (Corona) उपचारात प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाची अवैधपणे विक्री करणाऱ्या टोळीला यवतमाळ (Yavatmal) पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रेमडेसिवीरच्या 9 व्हायल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून कळंब पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरभ मोगरकर, बिलकीस बानो […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

यवतमाळ: कोरोनावरील (Corona) उपचारात प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाची अवैधपणे विक्री करणाऱ्या टोळीला यवतमाळ (Yavatmal) पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रेमडेसिवीरच्या 9 व्हायल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून कळंब पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरभ मोगरकर, बिलकीस बानो अशी अटक केलेल्या चारही आरोपींची नावं असल्याचं समजतं आहे.

खरं आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखाल? ‘या’ टिप्स नक्की उपयोगात येतील!

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब इथे एक डॉक्टर आणि औषध विक्रेता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करत विक्री करत असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या टीमला मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागच्या मदतीने सापळा रचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp