मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण, लग्नसोहळ्यात होते हजर - Mumbai Tak - cabinet minister chagan bhujbal covid 19 test comes out positive - MumbaiTAK
बातम्या

मंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण, लग्नसोहळ्यात होते हजर

महाविकास आघाडी सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे काही कारण नाही. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी […]

महाविकास आघाडी सरकारमधील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे काही कारण नाही. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि मास्क व सॅनिटायजरचा वापर करावा असं आवाहन भुजबळ यांनी केलंय.

दरम्यान छगन भुजबळांसह शरद पवारांनी रविवारी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. त्यामुळे या लग्नसोहळ्यात भुजबळांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्र्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. सर्वात आधी जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही कोरोनाग्रस्त झाले. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेवर लक्ष ठेवून असणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपेंनाही कोरोना झाला. याव्यतिरीक्त डॉ. राजेंद्र शिंगणे, एकनाथ खडसे यांच्यानंतर छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी जनतेशी संवाद साधताना येत्या ८ ते १० दिवसांनंतर लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत. अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + four =

Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर