शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काय करणार?; एकनाथ शिंदेंनी कोणत्या केल्या घोषणा?
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी विधानसभेत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही घोषणा केल्या. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांगीण आराखडा तयार केला जाईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी चर्चेला उत्तर देताना शेती क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या… -अतिवृष्टीमुळे […]
ADVERTISEMENT

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी विधानसभेत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई प्रस्तावावर चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही घोषणा केल्या. राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांगीण आराखडा तयार केला जाईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी चर्चेला उत्तर देताना शेती क्षेत्रासाठी कोणत्या घोषणा केल्या…
-अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) झालेली नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता, सततच्या मुसळधार पावसामुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास, त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं.
-गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडींमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
-झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबींचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.