“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…” : CM शिंदेंचा टोमणा
Ajit Pawar vs Eknath Shinde : मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांचे शुक्रवारी सभागृहात दमदार भाषण झालं. यात विरोधकांना टोले होते, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोमणे होते आणि सभागृहासाठी मनमुराद हशा होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदेवर केलेल्या टीकांना आजच्या […]
ADVERTISEMENT

Ajit Pawar vs Eknath Shinde :
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांचे शुक्रवारी सभागृहात दमदार भाषण झालं. यात विरोधकांना टोले होते, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोमणे होते आणि सभागृहासाठी मनमुराद हशा होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदेवर केलेल्या टीकांना आजच्या भाषणातून शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच सरकारने केलेल्या कामाचा आढावाही सभागृहापुढे ठेवला. (Chief Minister Eknath Shinde gave a powerful speech in the assembly on Friday)
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…”
अजितदादा शिवसेनेची इतकी बाजू मांडायला लागले आहेत की, त्यांना आता एखादं पदं द्यायचं बाकी आहे, असं शिंदे यांनी यांनी म्हणताच शेजारी बसलेल्या फडणवीस यांनी शिंदेंच्या वाक्याला दुजोरा देत “सहशिवसेनाप्रमुख…” असं सुचवलं. यावर परत शिंदे म्हणाले, पण आता तेही पद देऊ शकत नाही. कारण शिवसेना तर आमच्याकडे आहे. दादा आता तीही संधी गमावली. शिंदे यांच्या टोल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
Nagaland मध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story