ऊर्फीला अंगप्रदर्शन भोवणार? चित्रा वाघ भेटल्या पोलीस आयुक्तांना, म्हणाल्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोशल मीडियावर आपल्या वेशभूषेनं सणसणी निर्माण करणारी अभिनेत्री ऊर्फी जावेदच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. ऊर्फी जावेद परिधान करत असलेल्या कपड्यांवरून भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. चित्रा वाघ यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन तक्रार केलीये.

ऊर्फी जावेद दररोज कुठल्या ना कुठल्या नव्या अवतारात दिसते. ऊर्फी जावेदच्या चित्रविचित्र फॅशनविरुद्ध चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. चित्रा वाघ यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी ऊर्फी जावेदचा एक व्हिडीओ ट्विट करत टीका केली होती. त्यावर ऊर्फीनेही चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं.

व्हिडीओ ट्विट केल्यानंतर आज (1 जानेवारी 2023) चित्रा वाघ यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेदची मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेदला चांगलंच सुनावलेलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘तात्काळ हिला बेड्या ठोका’; चित्रा वाघ चिडल्या, ऊर्फी जावेदही भडकली

ऊर्फी जावेदची चित्रा वाघांनी पोलीस आयुक्तांकडे केली तक्रार…

चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेदच्या कपड्यांवरून पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. तसेच तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केलीये. चित्रा वाघ यांनी तक्रारीत काय म्हटलंय ते वाचा…

ADVERTISEMENT

“ऊर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल.”

ADVERTISEMENT

“स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणंघेणं नाही. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे.”

“तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत, याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे.”

चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं होतं?

चित्रा वाघ यांनी 31 जानेवारी 2022 रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेलं होतं की, “शी…ऽऽऽऽ अरे… हे काय चाललयं मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्ताणपणे नंगटपणा करणारी ही बाई, हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC (कायदे) आहेत की नाही?”

“तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत, तर ही बया अजून विकृती पसरवतीये”, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ऊर्फी जावेदवर केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT